
जळगाव , 05 सप्टेंबर (हिं.स.) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक विहित कागदपत्रांसह दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. जळगाव शहरात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मुलांचे शासकीय वसतिगृह, शिव कॉलनी, जळगाव व मुलींचे शासकीय वसतिगृह, गिरणा पाणी टाकीजवळ, वाघ नगर रोड, जळगाव शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी वरील विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन विशाल पंढरीनाथ राठोड, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक विहित कागदपत्रांसह दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. जळगाव शहरात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मुलांचे शासकीय वसतिगृह, शिव कॉलनी, जळगाव व मुलींचे शासकीय वसतिगृह, गिरणा पाणी टाकीजवळ, वाघ नगर रोड, जळगाव शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी वरील विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन विशाल पंढरीनाथ राठोड, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर