लंडन स्क्वॅश क्लासिक : भारताची अनाहत सिंग उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
लंडन, ५ सप्टेंबर (हिं.स.) पीएसए गोल्ड-स्तरीय लंडन स्क्वॅश क्लासिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, युवा भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगला मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या शिवसंगरी सुब्रमण्यमकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिसऱ्य
अनाहत सिंग


लंडन, ५ सप्टेंबर (हिं.स.) पीएसए गोल्ड-स्तरीय लंडन स्क्वॅश क्लासिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, युवा भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगला मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या शिवसंगरी सुब्रमण्यमकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या मानांकित शिवसंगरीने अनाहतचा १७ मिनिटांत ११-४, ११-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शिवसंगरीने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवले. तिने भारतीय खेळाडूला लय पकडू दिली नाही आणि सहज विजय मिळवला. उपांत्य फेरीत तिचा सामना इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित आणि विद्यमान विश्वविजेत्या अमिना ओर्फीशी होईल. जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकावर असलेल्या १८ वर्षीय अनाहतने, बेल्जियमच्या आठव्या मानांकित नेले गिलिसचा तीन गेमच्या रोमांचक सामन्यात पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

विजयानंतर शिवसंगारीने सांगितले की, मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. अनाहत ही एक खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तिने काही अव्वल खेळाडूंना हरवले आहे आणि त्यापैकी बहुतेकांना कडवी झुंज दिली आहे. दरम्यान, अनाहतचा हा पराभव आशियाई खेळांच्या काही आठवड्यांपूर्वीच झाला आहे. आशियातील अव्वल क्रमांकाची खेळाडू, शिवसंगारी, आगामी खंडीय खेळांमध्ये अनाहतची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande