सोलापूर : गणेश मंडळांना २४ तासांत मिळणार तात्पुरती अधिकृत वीजजोडणी
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना तात्पुरती अधिकृत वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने तयारी पूर्ण केली आहे. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत मंडळांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यामु
Ganpati


सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना तात्पुरती अधिकृत वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने तयारी पूर्ण केली आहे. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत मंडळांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांनी अनधिकृत वीजजोडणी न घेता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने शहरातील गणेश मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. तात्पुरत्या वीजजोडणीसाठी मंडळांना महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच ग्राहक मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. याशिवाय जुनी गिरणी परिसरातील शहर कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्र (सीएफसी) तसेच शहरातील विविध सेक्शन कार्यालयांमध्येही संपर्क साधता येणार आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीचे दर घरगुती वीजपुरवठ्याच्या दरानुसार निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून अधिकृत वीजजोडणी घेणे सुरक्षित असून, नियमांच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणने आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली असून, उत्सवा दरम्यान वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande