
बीड, 06 सप्टेंबर (हिं.स.)। बीडमध्ये डॉक्टर तरुणीवर गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पाजून बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, २०१८-१९ मध्ये क्लासेसदरम्यान झालेल्या ओळखीनंतर आरोपीकडून तरुणीचा पाठलाग आणि लग्नासाठी दबाव सुरू होता. फेब्रुवारी २०२४ मध्ये घरात कोणी नसताना गुंगीचे पाणी पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहातील घटनेनंतर काही ग्राहकांनी पोलिसांना माहिती दिली. दोघांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तरुणीने वडील आणि मामाला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी शेख मुस्सवीर शेख वशीम याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis