कोल्हापूर - महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या रुकडीतील चौघांवर गुन्हा दाखल
वीजचोरी तपासणीस गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या  रुकडी (ता. हातकणंगले) येथील चौघांवर गुन्हा नोंद दाखल झाला
कोल्हापूर - महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या रुकडीतील चौघांवर गुन्हा दाखल


कोल्हापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। स्मार्ट मीटर बसविणे व वीजचोरी तपासणीच्या कामासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना वर्धमाननगर, रुकडी (ता. हातकणंगले) येथे घडली. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात कनिष्ठ अभियंता अशरफ मुल्ला यांच्या तक्रारीनुसार किशोर दगडू चव्हाण, विशाल वसंत गोसावी, विनायक भिमराव चव्हाण व विमल भिमराव चव्हाण यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, वर्धमाननगर, रुकडी (ता. हातकणंगले) येथे भीमराव बाबुराव चव्हाण या वीज ग्राहकाच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसविणे व वीजचोरी तपासणीचे काम ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरु होते. त्यावेळी संबंधित व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर सदर वीज ग्राहकांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर कनिष्ठ अभियंता अशरफ अब्दुल मुल्ला यांनी वरिष्ठांना माहिती देऊन हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

*मिटर बदलताना ग्राहकांच्या परवानगीची आवश्यक नाही – गणपत लटपटे*

वीज कर्मचारी जेव्हा स्मार्ट मीटर बसवणे, चोरीच्या अनुषंगाने तपासणी करणे करिता वीज ग्राहकांकडे जातात तेव्हा सदर कामी ग्राह्काच्या परवानगीची आवश्यकता कायदानुसार नसते. स्मार्ट मिटर हे ग्राहकांच्या हिताचे असून वीज ग्राहकांनी सहकार्य करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande