अमेरिकन ओपन 2026: झ्वेरेव्ह अलेहांद्रो ताबिलोला पराभूत करत चौथ्या फेरीत
न्यूयॉर्क, 06 सप्टेंबर (हिं.स.)आपल्या पहिल्या अमेरिकन ओपन विजेतेपदाच्या शोधात असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने, आर्थर ॲश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चिलीच्या अलेहांद्रो ताबिलोला ६-२, ७-६(२), ६-२ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करून चौथ
अलेक्झांडर झ्वेरेव्हने


न्यूयॉर्क, 06 सप्टेंबर (हिं.स.)आपल्या पहिल्या अमेरिकन ओपन विजेतेपदाच्या शोधात असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने, आर्थर ॲश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चिलीच्या अलेहांद्रो ताबिलोला ६-२, ७-६(२), ६-२ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रत्येकी पाच सेट्स चाललेले पहिले आणि दुसरे फेरीचे सामने जिंकून तिसऱ्या फेरीत पोहोचलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला अलेहांद्रो ताबिलोविरुद्ध विजय मिळवण्यासाठी कमी मेहनत करावी लागली. झ्वेरेव्हने हा सामना २ तास आणि २६ मिनिटांत जिंकला.

दुसरीकडे, चौथ्या मानांकित अमेरिकन टेनिसपटू लर्नर टिएनने लुई आर्मस्ट्राँग स्टेडियमवर तीन तास आणि २४ मिनिटे चाललेल्या पाच-सेटच्या सामन्यात ६-३, १-६, ६-७(२), ६-३, ६-४ असा विजय मिळवला आणि आपल्या घरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत याकूब मेन्सिकला पराभूत करून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवली. या विजयासह, २० वर्षीय टिएन अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत पोहोचणारा सर्वात तरुण अमेरिकन टेनिसपटू ठरला आणि त्याने अँडी रॉडिकच्या विक्रमाची बरोबरी केली. रॉडिकनेही २००२ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी यूएस ओपनची चौथी फेरी गाठली होती. टिएनचा पुढील सामना माजी जागतिक क्रमांक ८ कॅरेन खाचानोव्हशी होईल. खाचानोव्हने बेंजामिन बोन्झीचा ६-३, ६-२, ६-४ असा सहज पराभव करून चौथी फेरी गाठली.

अमेेरिकन ओपनमधील महिला एकेरीतील उत्कंठा वाढतच आहे. १८ वर्षीय अमेरिकन टेनसिसपटू इवा जुविकने अलेक्झांड्रा एलाचा तीन सेटच्या चुरशीच्या सामन्यात पराभव करून पहिल्यांदाच आपल्या घरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दरम्यान, नाओमी ओसाका आणि एलेना रायबाकिना यांनीही आपापले सामने जिंकून १६ संघांच्या फेरीत त्यांची भेट निश्चित केली. आर्थर ॲश स्टेडियमवर, जुविकने फिलिपिन्सच्या एलाचा ७-५, ३-६, ७-५ असा पराभव केला. सामना तीन तासांहून अधिक काळ चालला आणि तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंमध्ये जोरदार लढत झाली. आता चौथ्या फेरीत जुविकचा सामना अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफशी होईल

माजी जागतिक नंबर वन इगा स्वियाटेकनेही अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले आहे. तिने २५ व्या मानांकित मारी बौझकोव्हाचा ७-६ (३), ७-६ (३) असा पराभव केला. सामना २ तास २७ मिनिटे चालला. दोन्ही सेट्समध्ये स्वियातेकसमोर कठीण आव्हाने होती. पहिल्या सेटमध्ये, ६-५ अशा स्थितीत बुझकोव्हा सेट जिंकण्याच्या स्थितीत होती, पण स्वियातेकने पुनरागमन करत टाय-ब्रेकमध्ये सामना जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही, ६-५ अशा स्थितीत बुझकोव्हाकडे तीन सेट पॉईंट्स होते, पण स्वियातेकने व्हॉली विनरने धोका टाळला आणि त्यानंतर टाय-ब्रेकमध्ये वर्चस्व गाजवून सामना जिंकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande