विदर्भात ४० लाख हेक्टरवरील पिके संकटात; ऑगस्टमध्ये ५८ टक्के पावसाची तूट
अमरावती, 07 सप्टेंबर (हिं.स.)पावसाचे उशिरा आगमन, सुरवातीची अनिश्चितता, काही भागांत अतिवृष्टी, दुबार-तिबार पेरणी आणि आता ऐन पीकवाढीच्या काळात पडलेला दीर्घ कोरडा खंड, यामुळे यंदाचा मॉन्सून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कृषी आणीबाणीच्या उंबरठ्यावर प
मॉन्सूनने पश्चिम विदर्भाला दिला धोका


अमरावती, 07 सप्टेंबर (हिं.स.)पावसाचे उशिरा आगमन, सुरवातीची अनिश्चितता, काही भागांत अतिवृष्टी, दुबार-तिबार पेरणी आणि आता ऐन पीकवाढीच्या काळात पडलेला दीर्घ कोरडा खंड, यामुळे यंदाचा मॉन्सून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कृषी आणीबाणीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील सुमारे ४० लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर आणि अन्य खरीप पिके उत्पादन संकटात सापडली आहेत. ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट ऑगस्टमध्ये विदर्भात सरासरी २९७.१ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ १२५.५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे तब्बल ५८ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. जिल्हानिहाय परिस्थितीही गंभीर आहे. हवामान बदलाचे चौफेर संकट हवामान बदलामुळे एकाच हंगामात अतिवृष्टी, दीर्घ कोरडा खंड, अचानक मुसळधार पाऊस आणि वाढते तापमान अशी चारही संकटे शेतकऱ्यांसमोरउभी राहत आहेत. त्यामुळे पारंपरिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पश्चिम विदर्भातील परिस्थितीचे तालुकानिहाय वैज्ञानिक मूल्यांकन करून पात्र भागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. तसेच ४० लाख हेक्टरवरील पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची विशेष मदत द्यावी, अशीही मागणी आहे. कर्जवसुलीला संरक्षण, पीकविम्याचे दावे तातडीने निकाली काढणे, कापूस-सोयाबीन-तुरीची हमीभावाने सरकारी खरेदी आणि जलसुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ओलावा संपत चालला कापूस सध्या पाते, फुले आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यात असून, तुरीच्या वाढीवरही कोरड्या हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात जमिनीतील ओलावा कमी झाल्याने उत्पाद जुलैमध्ये काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे हंगामाची संचयी पावसाची तूट तुलनेने कमी दिसत असली, तरी शेती केवळ हंगामातील एकूण पावसावर नव्हे, तर सध्याच्या जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून असते, असे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

पावसाची तूट कुठे?

अकोला ८४ टक्के

अमरावती ८२ टक्के

यवतमाळ ७८ टक्के

वर्धा ७३ टक्के

वाशीम ७१ टक्के

बुलडाणा ६१ टक्के

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande