कामगारांसाठी नवीन कामगार संहितेबाबत कायदेविषयक जनजागृती
पुणे, ७ सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि Aajivika Bureau यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांसाठी नवीन कामगार संहितेबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांच्या
कामगारांसाठी नवीन कामगार संहितेबाबत कायदेविषयक जनजागृती


पुणे, ७ सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि Aajivika Bureau यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांसाठी नवीन कामगार संहितेबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती आर. देशपांडे तसेच संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग एस. पी. नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी एस. पी. नार्वेकर यांनी नवीन कामगार संहितेतील विविध तरतुदी, कामगारांचे हक्क तसेच त्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. सचिव रेवती आर. देशपांडे यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या मोफत कायदेविषयक सेवा, मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली.कार्यक्रमास कामगार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक करणे तसेच विधी सेवा सुविधांपर्यंत त्यांचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande