लातूरमध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची विशेष मोहीम
लातूर, ७ सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहरातील डेंग्यू व इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष ऍबेटिंग राऊंड, ताप सर्वेक्षण तसेच डास उत्पत्तीस्थळ निर्मूलनाची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.
व्यापक मोहीम


लातूर, ७ सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहरातील डेंग्यू व इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष ऍबेटिंग राऊंड, ताप सर्वेक्षण तसेच डास उत्पत्तीस्थळ निर्मूलनाची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.

ऑगस्ट २०२६ अखेर शहरातील डेंग्यू संशयित रुग्णांचे ३८२ रक्तजल नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी १५ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह, तर ३ रुग्ण चिकुनगुनिया पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे, डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेल्या १५ रुग्णांपैकी १२ रुग्ण १६ वर्षांखालील वयोगटातील आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांमध्ये तापाचे सर्वेक्षण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत आहे.

शाळा, शासकीय आस्थापनांमध्ये विशेष ताप सर्वेक्षण

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील शाळा तसेच शासकीय आस्थापनांमध्ये विशेष ताप सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास आवश्यक तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्राकडे संदर्भित करण्यात येणार आहे.तसेच शाळा व शासकीय आस्थापनांच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून पाणी साचलेली ठिकाणे नष्ट करणे, अॅबेटिंग करणे आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

गरजेनुसार धुरफवारणी

डासांचा प्रादुर्भाव आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार धुरफवारणी (फॉगिंग) करण्यात येणार आहे. मात्र, डेंग्यू प्रतिबंधासाठी केवळ धुरफवारणीपेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे ही प्रमुख प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याने नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू न देण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेसाठी आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.महानगरपालिकेने नागरिकांना पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande