बीडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने आणलेली ३६ गोवंशीय जनावरे आयशरसह जप्त
बीड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे आणून त्यांना अत्यंत तुटपुंज्या जागेत डांबून ठेवल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (भापोसे) यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. गव्हर्नमे
अ


बीड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे आणून त्यांना अत्यंत तुटपुंज्या जागेत डांबून ठेवल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (भापोसे) यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. गव्हर्नमेंट डी.एड. कॉलेजसमोरील एका शेडवर छापा टाकून पोलिसांनी ३६ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून, त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले आयशर वाहनही जप्त केले आहे. या कारवाईत एकूण अंदाजे ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने आणून एका शेडमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी स्वतः आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी कारवाई केली.

पोलिसांनी शेडची पाहणी केली असता, अत्यंत कमी जागेत तब्बल ३६ गोवंशीय जनावरे डांबून ठेवलेली आढळून आली. या जनावरांना कोणतीही पुरेशी जागा किंवा योग्य व्यवस्था नसल्याचेही कारवाईदरम्यान निदर्शनास आले. त्याच ठिकाणी जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे आयशर वाहन पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईमध्ये पोलिसांनी— ३६ गोवंशीय जनावरे – अंदाजे किंमत ६ लाख रुपये ; आयशर वाहन – अंदाजे किंमत २५ लाख रुपये असा एकूण ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कत्तलीच्या उद्देशाने जनावरे आणण्यात आल्याच्या संशयावरून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. ही जनावरे नेमकी कुठून आणण्यात आली, त्यांची वाहतूक कोण करत होते आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (भापोसे) स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande