नाशिकमध्ये कमिशनच्या वादातून व्यावसायिकाला बेदम मारहाण; लुटीनंतर खंडणीची मागणी
सरकारवाडा पोलीस ठाण्यात टोळीविरुद्ध गुन्हा नाशिक, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन दिले बांधकाम नाही म्हणून व्यावसायिकास मारहाण करून सहा तोळ्यांची सोन्याची चेन व ४२ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेत खंडणी मागणाऱ्या १२ ते १४ जणा
नाशिकमध्ये कमिशनच्या वादातून व्यावसायिकाला बेदम मारहाण; लुटीनंतर खंडणीची मागणी


सरकारवाडा पोलीस ठाण्यात टोळीविरुद्ध गुन्हा

नाशिक, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन दिले बांधकाम नाही म्हणून व्यावसायिकास मारहाण करून सहा तोळ्यांची सोन्याची चेन व ४२ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेत खंडणी मागणाऱ्या १२ ते १४ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भरत रामदास सोनवणे (रा. धात्रक फाटा, पंचवटी) हे बांधकाम व्यावसायिक असून, दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते गंगापूर नाका येथे उभे असताना संशयित आरोपी ऋषिकेश चौधरी, विकी ढोले व त्यांचे १२ ते १४ साथीदार हे त्यांच्याकडील गाड्यांमधून आले. फिर्यादीचा व्यावसायिक पार्टनर शरद देवरे याने कॉन्ट्रॅक्टमधील कमिशन दिले नाही म्हणून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी सोनवणे यांच्याकडील ६० ग्रॅमची ४ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन व ४२ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली, तसेच कॉन्ट्रॅक्टच्या पैशातून मिळणारे कमिशन खंडणीस्वरूपात मागितले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात ऋषिकेश चौधरी व विकी ढोले यांच्यासह १२ ते १४ जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande