बीड - गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोघे जेरबंद; ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। गोवंशीय जनावरांची विनापरवाना व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर बीड पोलिसांनी कारवाई करत ११ गोवंशीय जनावरे, पिकअप वाहन आणि दोन मोबाईल असा एकूण ₹६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तेलगाव नाका ते पिंपळनेर जाणा
अ


बीड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। गोवंशीय जनावरांची विनापरवाना व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर बीड पोलिसांनी कारवाई करत ११ गोवंशीय जनावरे, पिकअप वाहन आणि दोन मोबाईल असा एकूण ₹६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तेलगाव नाका ते पिंपळनेर जाणाऱ्या रस्त्यावर आदित्य कृषी कॉलेजसमोर करण्यात आली.

सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग बीड यांच्या तोंडी आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस पथक कार्यरत होते. याचदरम्यान गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करून पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांच्या मदतीने पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी आदित्य कृषी कॉलेजसमोर सापळा रचला.

पिकअपमध्ये जनावरे कोंबून वाहतूक

महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन पिंपळनेरच्या दिशेने जाताना संशयास्पदरीत्या आढळले. पोलिसांनी वाहन थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये तब्बल ११ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.

या जनावरांसाठी वाहनामध्ये चारापाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जनावरांची अशा पद्धतीने वाहतूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी कारवाईदरम्यान विविध रंग व वयाची ११ गोवंशीय जनावरे, iPhone-15, OnePlus मोबाईल तसेच महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन असा एकूण ₹६,७७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इसम गोवंशीय जनावरांना विनापरवाना वाहनामध्ये कोंबून, त्यांच्याशी क्रूरपणे वर्तन करून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

कायद्यानुसार कारवाई

या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(डी), ११(१)(ई) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ५(ए)(१), ५(ए)(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांच्या पुढील कायदेशीर प्रक्रिया तसेच त्यांच्या देखभालीबाबत संबंधित प्राधिकरणाच्या नियमानुसार कार्यवाही सुरू आहे.

सदर कारवाई वेंकटराम , बीड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सय्यद, पोलीस अंमलदार अशोक दराडे, राहुल शिंदे, अविनाश सानप, संतोष रणदिवे, कुलदीप औसरमल, शशिकांत ढाकणे आणि विशाल जगताप यांच्या पथकाने केली.

गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, त्यांना कोंबून नेणे आणि क्रूरपणे वागणूक देण्याच्या प्रकारांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande