
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। चेंबूर (ता.कुर्ला) येथील भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशन संस्थेला त्यांच्या वहिवाटीतील 1 हजार 735 चौ.मी. जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
संस्था सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कारणासाठी ही जमीन वापरत असून ती सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अंतर्गत नोंदणीकृत आहे. या संस्थेच्या वहिवाटीतील या जमिनीवर मुलांचे वसतिगृह, स्वयंपाकगृह तसेच काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरात आणला जातो. संस्थेने ही जमीन नियमानुकूल करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून विनंती केली होती. त्यानुसार या संस्थेला भाडेपट्टयावर नाममात्र दराने ही जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर