
रायगड, ८ सप्टेंबर (हिं.स.) : रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या क्षेत्रातील बाधित खातेदारांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची प्रक्रिया अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरू झाली आहे. संबंधित मिळकतीमध्ये कोणाचा हितसंबंध असल्यास अथवा भूसंपादनाबाबत काही हरकत असल्यास आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात हरकत दाखल करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ मधील कलम १९ (ब) नुसार बाधित गावांतील खातेदारांना भूसंपादनाचा मोबदला स्वीकारण्याबाबतच्या नोटिसा २ सप्टेंबर २०२६ रोजी बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील मौजे चौल तसेच मुरुड तालुक्यातील मौजे सावली आणि टोकेखार येथील खातेदारांकडून मोबदला स्वीकारण्यासाठी संमतीपत्रे प्राप्त होत आहेत.प्राप्त संमतीपत्रांच्या आधारे संबंधित खातेदारांना भूसंपादन मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला दर मान्य असलेल्या खातेदारांनी आपले संमतीपत्र १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सादर करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हितसंबंधितांना हरकतीची संधी
संपादित होणाऱ्या मिळकतीमध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीचा हितसंबंध असल्यास त्यांना हरकत नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अशा व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत हरकत दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत किंवा त्यांचा विचार केला जाणार नाही, असे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी कळविले आहे.भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याने बाधित खातेदारांना मंजूर दरानुसार मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित खातेदारांनी विहित मुदतीत संमतीपत्रे सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौल येथील संपादन क्षेत्र
मौजे चौल, ता. अलिबाग येथील संपादनात समाविष्ट गट/सर्वे क्रमांक व संपादित क्षेत्र पुढीलप्रमाणे :
गट क्र. १४६ पै — ०.०११० हे.आर.
गट क्र. १४८ पै — ०.३७०० हे.आर.
गट क्र. १४९ पै — ०.०१०८ हे.आर.
गट क्र. २७१५ पै — ०.१३४० हे.आर.
गट क्र. २७१६ पै — ०.१२३७ हे.आर.
गट क्र. २७१७ पै — ०.१११९ हे.आर.
गट क्र. २७१८ पै — ०.१३५४ हे.आर.
गट क्र. २७१९ पै — ०.११३७ हे.आर.
गट क्र. २७२० पै — ०.१९८४ हे.आर.
गट क्र. २७२२ पै — ०.१३१० हे.आर.
गट क्र. २७२४ पै — ०.१५७९ हे.आर.
गट क्र. २७२५ पै — ०.०३९४ हे.आर.
गट क्र. २७२७ पै — ०.१८१८ हे.आर.
गट क्र. २७३० पै — ०.२१२२ हे.आर.
गट क्र. २७३२ पै — ०.१९३७ हे.आर.
गट क्र. २७३५ पै — ०.२०९४ हे.आर.
गट क्र. २७३६ पै — ०.२३१० हे.आर.
गट क्र. २७३८ पै — ०.१६९२ हे.आर.
गट क्र. २७३९ पै — ०.११०६ हे.आर.
गट क्र. २७४४ पै — ०.११९९ हे.आर.
गट क्र. २६९० पै — ०.०३५९ हे.आर.
गट क्र. २७२१ पै — ०.११०६ हे.आर.
सावली येथील संपादन क्षेत्र
मौजे सावली, ता. मुरुड येथील संपादनात समाविष्ट गट/सर्वे क्रमांक व क्षेत्र :
गट क्र. २४३ पै — ०.०१.४० हे.आर.
गट क्र. २३७ पै — ०.०१.१२ हे.आर.
गट क्र. १८९ पै — ०.०५.१६ हे.आर.
गट क्र. १८० पै — ०.२१.९५ हे.आर.
गट क्र. १८२ पै — ०.००.४९ हे.आर.
गट क्र. १८४ पै — ०.०२.४१ हे.आर.
गट क्र. १८६ पै — ०.०३.१६ हे.आर.
गट क्र. १८७ पै — ०.००.५७ हे.आर.
गट क्र. १७९ पै — ०.०६.०७ हे.आर.
गट क्र. १८८ पै — ०.११.४३ हे.आर.
गट क्र. १९० पै — ०.०९.८० हे.आर.
गट क्र. १४० पै — ०.०२.१२ हे.आर.
गट क्र. १९१ पै — ०.०५.७८ हे.आर.
गट क्र. १९२ पै — ०.०१.५२ हे.आर.
गट क्र. १२३ पै — ०.४२.८२ हे.आर.
गट क्र. ११० पै — ०.०३.५६ हे.आर.
गट क्र. १२४ पै — ०.०१.४३ हे.आर.
गट क्र. १२२ पै — ०.०४.७५ हे.आर.
गट क्र. १२० पै — ०.००.०२ हे.आर.
गट क्र. ११९ पै — ०.००.२८ हे.आर.
गट क्र. ३९६ पै — ०.०५.३० हे.आर.
गट क्र. ११४ पै — ०.०२.१४ हे.आर.
गट क्र. १११ पै — ०.०३.०० हे.आर.
गट क्र. ११२ पै — ०.०३.२६ हे.आर.
गट क्र. १०३ पै — ०.१४.२१ हे.आर.
गट क्र. ११३ पै — ०.०३.२७ हे.आर.
गट क्र. १०६ पै — ०.०१.३७ हे.आर.
गट क्र. १०२ पै — ०.१४.९३ हे.आर.
गट क्र. २४४ पै — ०.००.०३ हे.आर.
गट क्र. १०५ पै — ०.००.९८ हे.आर.
गट क्र. १०४ पै — ०.००.८१ हे.आर.
टोकेखार येथील संपादन क्षेत्र
मौजे टोकेखार, ता. मुरुड येथील संपादनात गट क्र. ३२ पै समाविष्ट असून त्याचे संपादित क्षेत्र ०.१५४२ हे.आर. आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)