छ. संभाजीनगर - हायवेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। हायवेवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्याकडील ऐवज लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आयशर टेम्पोचा पोलिसांनी पाठलाग करून तीन जणांना अंबेजवळगा शिवारात
अ


छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। हायवेवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्याकडील ऐवज लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आयशर टेम्पोचा पोलिसांनी पाठलाग करून तीन जणांना अंबेजवळगा शिवारातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आयशर टेम्पोसह सोन्याचे दागिने, इर्टिगा कार व अन्य मुद्देमाल असा एकूण २४ लाख ८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यांचा तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते. गोपनीय बातमीदारामार्फत एक आयशर टेम्पो दरोड्याचे साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सोनेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. संशयित आयशर टेम्पो भरधाव वेगाने येताना दिसला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करण्यात आला.

अंबेजवळगा शिवारात स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पोतील तिघांना ताब्यात घेतले. यावेळी टोळीतील अन्य तीन जण पसार झाले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोलारचे केबल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना जबरीने लुटल्याची माहितीही त्यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande