महावितरणकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 513 वीजचोरांवर कारवाई
कोल्हापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)|कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत 513 ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये मीटरमध्ये फेरफार केलेल्या कोल्हापूर
महावितरणकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 513 वीजचोरांवर कारवाई


कोल्हापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)|कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत 513 ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये मीटरमध्ये फेरफार केलेल्या कोल्हापूर मंडलात 83 वीजचोऱ्यांचा तर सांगली मंडलात 280 वीजचोरांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा - 2003 च्या कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तर कलम 126 प्रमाणे अनधिकृत वीजवापराचे 150 प्रकार आढळून आले आहेत.

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु असते. त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 4741 तर सांगली जिल्ह्यात 2990 वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातील वीजचोरीविरुद्ध मोहिमेत कोल्हापूर शहर विभागात 23, कोल्हापूर ग्रामीण विभाग 1 मध्ये 17, कोल्हापूर ग्रामीण विभाग 2 मध्ये 95, जयसिंगपूर विभागात 23, इचलकरंजी विभागात 14 तर गडहिंग्लज विभागात 36 वीजचोरांवर कलम 126 व कलम 135 नुसार कारवाई करण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यातील वीजचोरीविरुद्ध मोहिमेत सांगली शहर विभागात 04, सांगली ग्रामीण विभागात 41, कवठेमहांकाळ विभागात 96, विटा विभागात 103, तर ईश्वरपूर विभागात 61 वीजचोरांवर कलम 126 व कलम 135 नुसार कारवाई करण्यात येत आहे.

वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले आहेत. विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा व फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande