मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; विखे पाटील यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी
नाशिक येथे राज्य समन्वयकांची बैठक; सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नाशिक, 08 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज नाशिक येथे राज्यातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक व पदाधिकाऱ्य
Maratha Kranti Morcha is


Maratha Kranti Morcha is


नाशिक येथे राज्य समन्वयकांची बैठक;

सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप

नाशिक, 08 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज नाशिक येथे राज्यातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून राज्य सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात संविधानिक व कायदेशीर चौकटीत देण्यात आलेल्या १० टक्के SEBC आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ३०/२०२४ द्वारे आव्हान देण्यात आले असून सदर याचिका प्रलंबित आहे.या प्रकरणाच्या सुनावणीकडे राज्य सरकारकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.आरक्षणाच्या संरक्षणासाठी सरकारने प्रभावीपणे न्यायालयीन भूमिका मांडणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्यास त्याची जबाबदारी मराठा आरक्षण उपसमिती आणि राज्य सरकारने स्वीकारावी,अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांना विश्वासात घेऊन एकही ठोस बैठक घेतलेली नाही,असा आरोपही करण्यात आला.समाजाच्या विविध प्रश्नांवर सामूहिक चर्चा व समन्वयाची गरज असताना सरकारकडून मराठा क्रांती मोर्चाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात असल्याची भावना राज्य समन्वयकांनी व्यक्त केली.

सारथी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील अडचणी,विद्यार्थ्यांच्या फेलोशिप व शिष्यवृत्तीचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.सारथी संस्थेला भरीव आर्थिक बळ देण्यासाठी तातडीने १,००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी करण्यात आली.

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जावरील व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवावा.व्याज परतावा रखडल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून काही लाभार्थ्यांच्या कर्ज व क्रेडिट इतिहासावर परिणाम होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली.हा प्रश्न तातडीने मार्गी लावून लाभार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय राज्यातील काही शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये SEBC आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप करत संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

मराठा समाजाच्या आरक्षणासह सारथी, शिष्यवृत्ती,फेलोशिप,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,शासकीय व निमशासकीय सेवांमधील SEBC आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत.मराठा क्रांती मोर्चाला विश्वासात न घेता समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही,असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाने आजपर्यंत सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.मात्र समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सामूहिक नेतृत्व कमकुवत करून एका व्यक्तीभोवती चळवळ केंद्रित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.मराठा समाजाच्या प्रश्नांकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास त्याचे गंभीर राजकीय व सामाजिक परिणाम सरकारला भोगावे लागतील,असा इशारा देण्यात आला.

सरकारने तातडीने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांशी चर्चा करून प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,असा एकमुखी निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.आंदोलनाच्या पुढील टप्प्याची तयारी आणि संघटनात्मक हालचाली आजपासूनच सुरू करण्यात येणार असल्याचे बैठकीत मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय करण गायकर यांनी सर्वानुमते स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहील आणि सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात मराठा क्रांती मोर्चा व राज्य सरकार यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला राजेंद्र कोंढरे,किशोर चव्हाण सुनील बागुल,करन गायकर विलास पांगरकर,गणेश कदम,नाना बच्छाव शिवाजी सहाणे महादेव देवसरकर,संजीव भोर,राजेंद्र दाते पाटील.प्रा.रवींद्र बनसोड सर,रघुनाथ चित्रे पाटील,नितीन सुगंधी,नवनाथ शिंदे,आशिष हिरे टिळक भोस,विजय काकडे,डॉ.रुपेश नाठे,परमेश्वर नलवडे,उद्धव काळे,राजाभाऊ शेटे,विलास देसाई,केशव अण्णा पाटील,राजेंद्र शेळके,प्रफुल वाघ,विक्रांत गायधनी संगीता सूर्यवंशी,ऍड स्वप्न राऊत,स्वाती कदम,पुनम पवार, सविता वाघ आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande