नोकरीसाठी आजच नोंदणी करा; २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ
रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एका
Register for a job today; Mega Job Fair on September 29.


रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी ५०० ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत पां. कोकाटे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांमधील विविध रिक्त पदे आणि ॲप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअरिंग, पदवी, अभियांत्रिकी, फार्मसी तसेच इतर पदवीधारक उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी महास्वयम् रोजगार पोर्टलवर नोंदणी करून आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर Employment–Job Seeker–Find A Job–Job Seeker Login या क्रमाने जाऊन Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. जिल्हा निवडून Vacancy Listing मधील आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. याशिवाय स्वतंत्र नोंदणी अर्जही भरावा लागणार आहे.

रोजगार मेळाव्यात नवउद्योजकांसाठी विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्वयंरोजगारासाठी इच्छुक युवकांना कर्ज योजना आणि मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहितीही देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास ०२१४१-२२२०२९ या कार्यालयीन क्रमांकावर किंवा राहुल वि. गुल्हाणे (७०२०७५८७०१) व म.भा. वखरे (९४२१६१३७५७) यांच्याशी संपर्क साधावा. १ ऑक्टोबरनंतरही रोजगार मेळाव्याशी संबंधित संधी उपलब्ध आहेत का, याची माहिती अधिकृत पोर्टलवर तपासावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande