युद्धविरामाची मुदत संपताच रशियाचा कीववर पुन्हा ड्रोन हल्ला
मॉस्को, 08 सप्टेंबर (हिं.स.)।युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे दूत युक्रेनच्या राजधानीच्या दौऱ्यावर असताना हल्ल्यांवर लावण्यात आलेली तीन दिवसांची स्थगिती संपल्यानंतर रशियाने पुन्हा कीववर हल्ले
तीन दिवसांची युद्धविरामाची मुदत संपताच रशियाचा कीववर पुन्हा ड्रोन हल्ला


मॉस्को, 08 सप्टेंबर (हिं.स.)।युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे दूत युक्रेनच्या राजधानीच्या दौऱ्यावर असताना हल्ल्यांवर लावण्यात आलेली तीन दिवसांची स्थगिती संपल्यानंतर रशियाने पुन्हा कीववर हल्ले सुरू केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी रशिया आणि युक्रेनच्या राजधानींचा दौरा केला होता. त्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कीववरील मॉस्कोच्या हल्ल्यांना तीन दिवसांसाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. युक्रेनच्या स्टेट इमर्जन्सी सर्व्हिसने टेलिग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले, “रशियन सैन्याने ड्रोनच्या माध्यमातून बोरिस्पिल आणि फास्टिव जिल्ह्यांवर हल्ला केला.”

कीव शहराच्या लष्करी प्रशासनाने सांगितले की, शत्रूच्या ड्रोन हल्ल्याचा धोका लक्षात घेता राजधानीत हवाई हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्थाने यापूर्वीच हल्ल्यांवरील स्थगितीची मुदत संपल्याची पुष्टी केली होती.

दरम्यान, स्टीव्ह विटकॉफ यांनी युक्रेन आणि रशियासोबत झालेल्या चर्चेतील प्रगतीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा संघर्ष संपवण्यासाठी रशिया, युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान त्रिपक्षीय शांतता चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande