


रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.) : कर्जत येथे विश्व हिंदू परिषदेचा ६२ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे प्रमुख व्यक्ती म्हणून उपस्थित होते. कोकण प्रांत मंत्री मोहन साळेकर, केंद्रीय धर्मप्रसार सहमंत्री अॅड. दीपक गायकवाड यांच्यासह संत, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात हिंदू समाजाचे संघटन, जनजागृती, धर्मप्रसार, गोवंश संरक्षण आणि सामाजिक समरसता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील विविध घटकांना संघटित करून संस्कृती, परंपरा आणि धार्मिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज व्यक्त करण्यात आली.गोवंश संरक्षणाच्या विषयावरही यावेळी विशेष भर देण्यात आला. केवळ गोहत्या बंद करण्यापुरता हा प्रश्न मर्यादित न ठेवता, शेतकऱ्यांकडून गोवंश विकला जाणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले.
यावेळी कर्जत प्रखंड समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी चंदन भडसावळे, उपाध्यक्षपदी दशरथ मुने, अनिल सुर्वे व जयश्री मसणे, तर मंत्रीपदी ऍड. श्याम कडव यांची नियुक्ती करण्यात आली. सहमंत्री म्हणून रवींद्र वेहेले, ऍड. भूपेश पेमारे, ऍड. जयेश म्हसे व अनंता हजारे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.बजरंग दलाच्या संयोजकपदी नितीन पवाळी, तर सहसंयोजकपदी मनीष भगत, उदय गवळी व यतीन भोसले यांची घोषणा करण्यात आली. मातृशक्ती संयोजिका म्हणून मृणालिनी शेळके व सहसंयोजिका म्हणून साधना जाधव यांची नियुक्ती झाली. दुर्गा वाहिनीच्या संयोजिका अॅड. पद्मजा गायकवाड व सहसंयोजिका ऍड. दिपाली मालुसरे यांची घोषणा करण्यात आली.
विधी प्रमुख म्हणून ऍड. समीर मसणे, गोरक्ष प्रमुख मयुरेश चौधरी, सहप्रमुख पारस खैरे, सत्संग प्रमुख दीपक महाराज दुर्गे, सेवाप्रमुख डॉ. मुकुंद चितळे, धर्माचार्य संपर्कप्रमुख ह.भ.प. वाळुंज महाराज, प्रसार-प्रचार प्रमुख हनुमान हिसाळके आणि धर्मप्रसार प्रमुख दीपक देशमुख महाराज यांची जबाबदारी जाहीर करण्यात आली.उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात हिंदू समाजाचे संघटन, संस्कृती संवर्धन, धर्मप्रसार आणि सामाजिक समरसतेच्या कार्याला अधिक बळ देण्याचा संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)