पुणे - नळ स्टॉप-माणिकबाग मेट्रो मार्गातील अडथळा दूर; उड्डाणपुलांचे आराखडे अंतिम
पुणे, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग मेट्रो मार्गाच्या उभारणीतील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर महर्षी कर्वे पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव महामेट
Metro Train


पुणे, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग मेट्रो मार्गाच्या उभारणीतील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर महर्षी कर्वे पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव महामेट्रोने महापालिकेकडे पाठविला आहे. हे उड्डाणपूल महापालिका की महामेट्रो उभारणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या मार्गाला मंजुरी दिली होती. ६.१२ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावर सहा स्थानके असतील. कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलतनगर आणि माणिकबाग या स्थानकांचा त्यात समावेश आहे.

या मार्गावर कर्वे पुतळा आणि आंबेडकर चौक येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्याची सूचना महापालिकेने केली होती. या पुलांचे आराखडे अंतिम झाल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. उड्डाणपूल उभारणीची जबाबदारी निश्चित झाल्यानंतर मेट्रो मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande