उद्धवा, अधम तुझे आचार आणि विचार
काहीही कर्तृत्व न दाखविता वडिलोपार्जित शिवसेनेचे वारसाहक्काने मुख्य झालेले आणि शरद पवारांची गुलामी
उद्धवा, अधम तुझे आचार आणि विचार


काहीही कर्तृत्व न दाखविता वडिलोपार्जित शिवसेनेचे वारसाहक्काने मुख्य झालेले आणि शरद पवारांची गुलामी स्वीकारून त्यांच्याप्रमाणे विश्वासघाताने मुख्यमंत्रीपद लंपास करणारे उद्धव ठाकरे ह्यांच्या विजयादशमीच्या भाषणावर राजकीय समालोचक म्हणून दोन शब्द लिहिण्याचे कटू कर्तव्य करावे लागत आहे ० सत्तेचे व्यसन .वडिलांना दिलेले वचन , सरसंघचालक भागवतांना पायरी सोडून विचारलेले प्रश्न, महाराष्ट्राचा अपमान असे अनेक विषय त्यांनी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात निवडक श्रोत्यांच्या उपस्थितीत अपरिपक्व अभिनिवेशात मांडले आहेत ० दिल्लीपतींना ' हरहर महादेव ' ह्या घोषणेचा दणका दाखवायलाच पाहिजे हा मराठी माणसाला दिलेला आदेश हे ह्या भाषणाचे सार आहे ० ह्या माझ्या लेखाचा ठाकरे ह्यांच्यावर काही परिणाम होईल अशी माझी अपेक्षा नाही ० विकला गेलेला माणूस विकत घेणाऱ्याला हवे ते आणि तसे बोलत असतो ० आज उद्धव ठाकरे शरद पवार पढवतील तसे बोलत आहेत ० ते त्यांना समजावून सांगणाऱ्या अशा लेखांकडे दुर्लक्ष करण्याइतके निर्ढावलेले असू शकतात ० परंतु काही प्रामाणिक , खस्ता खालेल्या आणि विचार करू शकणाऱ्या शिवसैनिकांवर परिणाम होऊ शकतो ० आपले नेते आपल्याला वेठबिगारी मजूर समजतात आणि त्यांचे भ्रष्टाचारी राजकारण ते मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या नावावर आपल्यावर लादू पाहतात हे त्यांच्या कदाचित लक्षात येऊ शकते ० कारण माझा अनेक शिवसैनिकांशी जुना आणि चांगला परिचय आहे ०

अमली पदाथांचे सेवन आणि व्यापार ह्या संदर्भात चित्रपट अभिनेता शाहरुख खान ह्याचा मुलगा आर्यन खान ह्याच्यासकट काहीजणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे ० उद्धवना त्याचा राग आलेला दिसतो ० अमली पदार्थाच्या व्यसनामुळे तरुणांचे जीवन उध्वस्त होत आहे आणि ह्या अमली पदार्थाच्या विक्रीतून येणारा पैसा आतन्कवाद्यांच्या स्वाधीन केला जात आहे ह्याविषयी उद्धवना काही वाटत नाही असे दिसते ० पण केंद्र म्हणजे मोदी सरकारवर उघड ताशेरेही मारता येत नाही ० म्हणून आपली नाराजी त्यांनी आडून व्यक्त केली ० अमली पदार्थापेक्षा सत्तेचे व्यसन भयंकर असते आणि भाजप सध्या त्या व्यसनाच्या पुष्कळ आहारी गेला आहे असा आरोप जणू भीष्माचार्याच्या भूमिकेत शिरून समोर बसलेल्या पांडवांना उद्देशून त्यांनी केला आहे ० वास्तवात उद्धव सध्या काँग्रेस संस्कृतीच्या सेवेत रममाण असून त्यामुळे आपला पुढचा दहा पिढ्यांचा उत्कर्ष कसा साधता येईल ह्यावाचून दुसरा विचार त्यांच्या मनात येत नसावा ० म्हणून काँग्रेस,भाजप आणि सत्तेचे व्यसन ह्या तीन विषयांचा परस्पर संबंध त्यांना दाखविण्याचा प्रयत्न करून पाहू ०

आपण थकलो आहोत आणि स्वातंत्र्यलढा अधिक काळ पुढे रेटण्याची आपल्यात शक्ती उरलेली नाही असे जवाहरलाल नेहरूंना शेवटी शेवटी वाटत होते ० शरद पवारांचे पाय चेपून झाल्यावर वेळ मिळाला आणि वाचायची इच्छा असली तर स्वातंत्र्य आंदोलनातील शेवटच्या दोनचार वर्षाच्या कालखंडावरील मौलाना आझाद ,कृपलानी , दुर्गादास ,मधू लिमये , तळवलकर ,शेषराव मोरे प्रभृतींचे लिखाण वाचले की नेहरूंना स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानाच्या खुर्चीत बसण्याची किती घाई झाली होती हे लक्षात येते ० वर्षसहामहिने त्यांनी कळ काढली असती आणि वाटाघाटी लांबविल्या असत्या तर कदाचित फाळणी टाळता आली असती ० कारण जिनांचे आयुष्य संपत आले होते ० पण मुस्लिम लीगच्या आक्रमकपणाला सामोरे जाण्याइतके धैर्य नेहरूंच्या ठिकाणी राहिले नव्हते ० त्यामुळे ते लॉर्ड माऊंटबॅटनना शरण गेले आणि ते सांगतील त्याला होय म्हणत गेले ० सत्तेसाठी त्यांनी देशाचे तुकडे करणे पसंत केले ० अखंड भारतासाठी चाललेल्या बाराशे वर्षाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्व वीर पूर्वजांचा आणि समकालीन वीर देशभक्तांचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता त्यांनी कशी वापरली ? त्यांनी ही सत्ता गरिबांसाठी वापरली नाही ० भारताची सार्वभौमता,अखंडता,एकात्मता आणि स्वतंत्रता ह्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी ही सत्ता उपयोगात आणली नाही ० स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अडीच महिन्यांनी पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले ० नेहरूंनी हे आक्रमण परतवून लावण्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे सक्षम असलेल्या भारतीय सेनादलांना दिले नाही ० त्यांनी काश्मीरचा चाळीस प्रतिशत भूभाग पाकिस्तानला दिला आणि भारताकडे राहिलेला साठ प्रतिशत भूभाग शेख अब्दुल्लाच्या स्वाधीन केला ० आपले पंतप्रधानाचे अधिकार वापरून त्यांनी महाराज हरिसिंग ह्यांना काश्मिरातून हुसकावून लावले ० नेहरूंनी आपल्या सतरा वर्षाच्या पंतप्रधानांच्या राजवटीत जवळच्या शंभराहून अधिक नातेवाईकांना मानाच्या उबदार सरकारी नोकऱ्यांवर लावले ० विजयालक्ष्मी पंडितांनी शासकीय सेवेत असतांना काय थेर केले ते वाचल्यावर उद्धवांना नवी प्रेरणा मिळू शकेल ० दसऱ्याला शिमगा साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमशीलतेला खानदानी कलात्मकतेची जोड मिळू शकेल ० संन्यस्त वृत्तीच्या कर्मयोगी नरेंद्र मोदींना उठसूट शिव्या देतांना उद्धवनी हे लक्षात ठेवावे की चीनच्या आक्रमणापुढे भारताचा दारुण आणि लज्जास्पद पराभव झाल्यानंतरही नेहरूंनी पंतप्रधानपद सोडलेले नाही ० सत्तेच्या मोहाचा प्याला त्यांनी खाली ठेवला नाही ० नेहरूंनी इंदिरा गांधींना आपला वारस म्हणून निवडले आहे असे १९५६ मध्ये हिंदुस्थान टाइम्स ह्या दैनिकात संपादक दुर्गादास ह्यांनी लिहिले होते ० त्यामुळे नेहरू रागावले पण दुर्गादास ह्यांच्याशी दुसऱ्या दिवशी बोलतांना त्यांना बातमीचा इन्कार करता आला नाही ० हा देश म्हणजे आपली खासगी मालमत्ता मानून नेहरूंनी सत्ता आपल्यासाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी हवी तशी वापरली ० देवळात जातांना जोडे बाहेर काढून ठेवतात तसे नेहरूंच्या पणतवाला मुजरे ठोकायला जातांना उद्धव आपला मराठी बाणा आणि शिवाजीभक्ती संजय राऊतांच्या खोलीवर काढून ठेवत असावेत ० त्यांनी हरहर महादेवाच्या बाता मारू नयेत ० चिंतामणराव देशमुखांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांची सूची त्यांना पुराव्यासकट दिली होती ० तेव्हा नेहरूंनी ते कसेही असले तरी सत्ता संपादण्यासाठी आणि चालविण्यासाठी मला त्यांचा उपयोग होतो असे समर्थन करीत देशमुखांना परत पाठविले होते ० असे सत्तेचे व्यसन भाजपाला,जनसंघाला किंवा रा स्व संघाला आहे ह्याचे एकतरी उदाहरण उद्धव देऊ शकतील काय ?

राजस्थानमध्ये जमीन सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले गेले होते ० मोठ्या जमीनदारांवर त्याचा आघात होणार होता ० तरीसुद्धा जनसंघाचा विधेयकाला पाठिंबा होता ० जनसंघ विरोधी पक्षात होता आणि त्याच्या आमदारात दोन मोठे जमीनदार होते ० त्यांनी ह्या विधेयकाला प्रगटपणे विरोध केला ० दीनदयाळ उपाध्याय त्यावेळी जनसंघाचे अध्यक्ष होते ० त्यांनी पक्षशिस्त मोडली म्हणून ह्या प्रभावशाली आमदारांना पक्षातून काढून टाकले ० सत्तेपेक्षा त्यांनी तत्व मोठे मांनले आणि त्यासाठी त्याग करण्याची सिद्धता दाखविली ० गांधीहत्येनंतर संघावर चहूबाजूंनी वैचारिक आणि शारीरिक हल्ला झाला ० संघाच्या बाजूने बोलणारा एकही खासदार लोकसभेत नव्हता हे लक्षात आल्यावर संघाच्या काही स्वयंसेवकांनी एकत्र येऊन राजकीय अभिव्यक्तीसाठी जनसंघाची स्थापना केली ० मुसलमानांना बरे वाटावे म्हणून हिंदू संघटन आणि हिंदू विचार ह्यांना भल्याबुऱ्या मार्गांनी दुष्कीर्त करीत राहण्याची एकही संधी काँग्रेस संस्कृतीने सोडलेली नाही ० शिवसेनेलाही पन्नास वर्षे झाली आहेत ० अजूनही स्वतःच्या बळावर शंभर आमदार निवडून आणण्याची क्षमता सेनेने अर्जित केलेली नाही ० भाजप स्वतःच्या बळावर केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ताधीश झाला आहे ० राजकीय व्यासपीठावरून हिंदुहिताचा आवाज मुक्तपणे वातावरणात निनादत राहावा ह्या एकाच ध्येयाने संघाचे जनसंघात आणि भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते गेली पंचाहत्तर वर्षे खस्ता खात आले आहेत ० सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी अपवित्र युती केलेली नाही ० लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन त्यांनी सत्तारूढ काँग्रेसशी सतत संघर्ष केला ० त्याचप्रमाणे हिंदूंना त्यांचे राष्ट्र स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार कॉंग्रेस संस्कृतीने नाकारला आहे हे सत्य सतत सांगत राहण्याचे व्रत त्यांनी सोडले नाही ० काँग्रेसला सत्तेचे व्यसन आहे , त्यासाठी त्याला मुसलमानांच्या मतांची आवश्यकता आहे , मुसलमानांना मनाने भारतीय बनविण्याऐवजी त्यांच्यात पाकिस्तानी प्रवृत्तीची जोपासना कशी होत राहील ह्याची काळजी काँग्रेस घेत आली आहे ही वस्तुस्थिती सतत लोकांच्या कानावर घालत राहण्याचा संकल्प संघाच्या कार्यकर्त्यांनी थोडाही ढिला सोडला नाही ० हळूहळू कष्टपूर्वक त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला ०

गोध्र्याला ५९ कारसेवकांना आगगाडीच्या डब्यात जिवंत जाळून ठार मारले ० त्यावेळी गुजरातमध्ये भाजपचे राज्य होते ० ह्या एका घटनेने काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि भाजपचा मुख्यमंत्री ह्यांच्यातील फरक मुसलमानांच्या व्यवस्थित लक्षात आला ० काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांना अधिकार आणि हिंदूंना कर्तव्ये अशी श्रमविभागणी झाली होती ० मुसलमानांना दंगली करण्याचाही अधिकार होता ० टिळकयुगानंतर गांधी युग सुरु झाले ० गांधीयुग म्हणजे तमो युग असे डॉ आंबेडकरांनी म्हटले आहे ० गांधी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करीत असतांना भारतात झालेल्या दंगलीची आकडेवारी आणि इतिहास आंबेडकरांनी पाकिस्तानवरील पुस्तकात दिला आहे आणि त्या काळात भारतात यादवी युद्ध पेटले होते असे म्हटले आहे ० स्वतंत्र भारतातही दंगली करण्याचा आणि हिंदूंना मानसिक भयगंडावस्थेत ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे असे मुसलमान मानीत आले ० काँग्रेस सरकारांनी त्यांच्या ह्या अधिकाराविषयी कधी संशय व्यक्त केला नाही ० तो नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री झाल्यावर केला ० दंगली करण्याचा मुसलमानांचा अधिकार मोदींनी गुजरातमध्ये काढून घेतला ० जमाना बदलला आहे हे मुसलमानांच्या लगेच लक्षात आले ० येथून पुढे मुसलमान म्हणून आपले फाजील लाड होणार नाहीत ह्याची कल्पना त्यांना आली ० नागरिक म्हणून आपली कर्तव्ये काय आहेत ह्याचा शोध ते घेऊ लागले ० मुसलमान शांत झाले आणि गुजरातमध्ये पुन्हा त्यांनी दंगा केला नाही ० पाकिस्तानात हिंदूंचा नरसंहार झाला तसे मोदींनी गुजरातेत केले नाही ० जुने राज्यकर्ते म्हणून मस्तीत राहू नका ,नागरिक म्हणून अनुशासनात राहा अशी समज त्यांनी मुसलमानांना दिली आणि क्रांती झाली ० असे सामाजिक आणि राजकीय परिवर्तन मोदी सगळ्या भारतात करू पाहत आहेत ० बाकीचे अनेक पक्ष मुसलमानधार्जिणे असल्याने मोदींना केंद्रातल्याप्रमाणे सगळ्या राज्यात भाजपाची सत्ता आली तर हवे आहे ० उद्धव ह्याला सत्तेचे व्यसन म्हणतात ० अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करण्याचा वसा घेऊनच इस्लामी आक्रमक भारतावर चालून आले आहेत ० तो वसा आजच्या मुसलमानांनी टाकला आहे असे म्हणता येत नाही ० ते आव्हान परतवून लावण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ भाजपची सरकारे मोदींना सगळ्या भारतात पसरलेली हवी आहेत ० ही त्यांची रणनीती आहे आणि ती भारताच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक आहे ० भाजपची सरकारे अनके राज्यात राज्य करीत आहेत ती लोकशाही मार्गानी निवडून आलेली सरकारे आहेत ० त्याचे उद्धवना वैषम्य का वाटावे ? हिंदुत्व भारताचा राष्ट्रधर्म आहे , हिंदुत्व भारताचा प्राण आहे ,जातिधर्मनिरपेक्ष सर्व भारतीयांना त्यांच्या जन्मभूमीच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भवितव्यासाठी देशभक्तीच्या पवित्र भावनेतून कर्मयोगी बनविण्याची शक्ती हिंदुत्वाच्या तत्वज्ञानात आहे हे सिद्ध करण्याचा भगीरथ प्रयत्न नरेंद्र मोदी करीत आहेत ० त्याला एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा प्रमुख म्हणून उद्धवनी शतप्रतिशत सहकार्य करायला हवे ० पण पवारांकडून मिळणारा मलिदा आणि खलिता त्यांना हिंदुत्वापेक्षा मोठा वाटतो ०

शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे वचन आपण वडिलांना दिले होते , गांधी आणि सावरकर ह्यांचे नावही घेण्याची भाजपची लायकी नाही असे बरळून उद्धवनी सरसंघचालक मोहनराव भागवतांना , नचिकेताने यमराजाला विचारले त्या आविर्भावात काही प्रश्न विचारले आहेत ० म्हणून उद्धव ह्यांची शिकवणी घेणे आवश्यक झाले आहे ०

उद्धव ह्यांच्या एका भावाचे वडिलांशी म्हणजे बाळासाहेबांशी इस्टेटीवरून भांडण झाले होते आणि त्याने घर सोडण्याची भाषा केली होती ० त्याची समजूत काढतांना बाळासाहेब म्हणाले ," वाटण्या कशाला ? सगळे तुमचेच तर आहे ० तुला दुसरे काही जमत नसेल तर शिवसेनेत ये ० ती चालव " ० म्हणजे शिवसेना एक खासगी कंपनी आहे असे बाळासाहेब मानीत होते आणि वारसाहक्काने तिचा ताबा त्यांची मुले घेणार होती ० तिला मोठी करण्यासाठी शिवसैनिकांनी केवळ राबायचे होते ० त्यांची योग्यता कितीही असली तरी त्यांना शिवसेनेचे नेतृत्व कधीच मिळणार नव्हते ० जसे काँग्रेसचे नेतृत्व नेहरू घराण्याकडे तसे शिवसेनेचे नेतृत्व ठाकरे घराण्याकडे ० असे रा स्व संघात जनसंघात आणि भाजपमध्ये कधी झाले नाही ० विश्वस्ताच्या संकल्पनेतून ह्या संघटना चालतात ० कोणा एकाकडे मक्तेदारी नसते ० आणीबाणीत सरसंघचालक बाळासाहेब देवरस कारागृहात डांबले गेले असतांना सहनिवासी समाजवादी बंद्यांनी त्यांना प्रश्न विचारला , " सरसंघचालक गजाआड असतील तर बाहेर संघटना कोण चालविणार ? तुम्हाला पुरेपूर नियोजन करायला वेळ मिळाला का ?" बाळासाहेब उत्तरले ," एका सरसंघचालकाला अटक झाली एव्हढेच तुम्हाला माहीत आहे ० बाहेर असे पंधरावीस अनभिषिक्त सरसंघचालक मोकळे आहेत ० ते संघटना चालवीत आहेत "० संघातील पदे आणि अधिकाराची स्थाने हा प्रशासकीय सौकर्याचा भाग असतो ० एरव्ही सर्व स्वयंसेवक समान असतात ० संघात सामान्य स्वयंसेवक सरसंघचालकांना भेटू शकतो आणि मोकळेपणाने बोलू शकतो ० बाळासाहेब देवरस आणि राजेंद्रसिंहजी सरसंघचालक असताना हा अत्यंत सुखद अनुभव मी स्वतः अनेकवेळा घेतला आहे ० संघ आणि सावरकर ह्यांचे संबंध तसेच संघ आणि प्रसारमाध्यमे ह्या दोन विषयांवर मी बाळासाहेबांशी मुंबईत आणि नागपुरात अनेकवेळा गंभीर चर्चा केली आहे ० माझ्या मनातील शंकांचे मी समाधान करून घेतले आहे ० मला जो संघ समजला तो थोडक्यात सांगतो ० सत्य,अहिंसा ,सहिष्णुता ,धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्ये हिंदूला शिकविण्याची आवश्यकता नाही ० ती त्याच्या रक्तात आहेत ० परंतु बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यामुळे हिंदुहित कशात आहे ते ओळखण्याची बुद्धी तो हरवून बसला आहे ० त्याच्या गुणांचे रूपांतर सद्गुणविकृतीत झाले आहे ० त्यावर उपाय म्हणून त्याने कर्मयोगी झाले पाहिजे ,संघटित जीवन जगले पाहिजे आणि पडतील ते कष्ट घेऊन बंधुभाव जोपासला पाहिजे ० संघाला आता शंभर वर्षे पूर्ण होतील ० हिंदू समाजाला आत्मनिर्भर आणि कोणत्याही आव्हानाला समर्थपणे तोंड देण्याइतका सक्षम बनविण्यासाठी संघाचे हजारो प्रचारक भारतात सर्वदूर पसरून त्यागमय नैष्ठिक जीवन जगत आहेत ० सुरवातीच्या काळात तरी संघाचे बहुतेक प्रचारक महाराष्ट्रातले होते ० ह्या मातीत जन्माला आले होते ० संघाने मराठी माणसाला अखिल भारतीय व्यक्तिमत्व दिले ० त्याचा जीवनोद्देश राष्ट्रीय पातळीवर नेला ० संघ स्वयंसेवकाला फाळणीचे दु:ख आहे ० तो त्याचा घाव अजून बुजलेला नाही आणि बुजणार नाही ० म्हणून जे अखंड भारतवादी नाहीत त्यांच्याशी व्यवहार करतांना संघाचा माणूस दहावेळा विचार करतो ० म्हणून मोदींची साथ सोडून जो ममतादीदींच्या पदराचा आश्रय शोधू पाहतो तो मराठी माणूसही राहत नाही आणि हिंदुत्वनिष्ठेचे त्याचे नातेही डळमळीत होते ० प बंगालच्या सर्व सीमावर्ती जिल्ह्यात हिंदुत्वविरोधी भावना स्थानापन्न झाली आहे हे उद्धवना माहीत आहे काय आणि त्याविषयी ते ममतादीदींशी काय बोलणार आहेत ?

उद्धव ठाकरे ह्यांनी भाजपाची आणि नरेंद्र मोदी ह्यांची साथ सोडून अस्तंगत होत असलेल्या काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी मराठी माणसाला इंधन म्हणून वापरायचे ठरविले आहे ० काँग्रेस संस्कृती पुरुषार्थी नाही ० ती इस्लामप्रदर्शित क्रौर्याला प्रचंड घाबरते ० इस्लामी आतन्कवादाला काँग्रेस संस्कृतीचा अप्रत्यक्ष पाठिंबा असतो ० आपले हे पाप लपविण्यासाठी काँग्रेसने ह्या देशात हिंदू आतन्कवाद अस्तित्वात आहे हा शोध लावला ० काँग्रेसच्या राज्यात भारताची अखंडता , एकात्मता, स्वतंत्रता आणि सार्वभौमता सुरक्षित राहत नाही हे अनेकवार सिद्ध झाले आहे ० भाजपच्या पंचवीस वर्षाच्या संगतीत शिवसेना सडली अशी व्यथा उद्धव ह्यांनी पूर्वी अनेकवेळा मांडली आहे ० म्हणून शिवसेनेला ठाकठीक आणि टवटवीत करण्यासाठी उद्धवनी आपला मुक्काम सध्या शरद पवारांच्या आरोग्यधामात हलविला आहे ० प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे ह्यांना काँग्रेसकडून औषधोपचार करून घेणे मान्य झाले असते काय ? जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती म्हणून भारताचा पुनर्जन्म व्हावा ह्यासाठी सरंक्षण सिद्धतेत नवनवीन क्रांन्तिकारक योजना सुरु करण्याची घोषणा नरेंद्र मोदी ह्यांनी विजयादशमीच्या दिवशी केली ० टिळकांना आणि सावरकरांना ह्या घोषणेने आनंद झाला असता ० गांधींना आणि नेहरूंना झाला असता काय ?पंचाहत्तर वर्षात हा पहिला पंतप्रधान भारताने पाहिला ज्याने जगात ताठ मानेने जगण्यासाठी काय केले पाहिजे हे ओळखले ० जे शिवाजी महाराजांना अभिप्रेत आहे त्यानुसार मोदी चालत आहेत ० देशांतर्गत व्यवस्थेत गरिबांच्या मूलभूत गरजा भागविण्यावर आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यावर त्यांचा जोर आहे ० जागतिक प्रांगणात महासत्ता म्हणून भारताचा उदय व्हावा ह्या दृष्टीने त्यांची पावले दमदारपणे पडत आहेत ० संपूर्ण राष्ट्र खऱ्या अर्थाने त्यादिवशी दसरा साजरा करीत होते ० त्यादिवशी खऱ्या अर्थाने शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन झाले ० अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमरात भारत हरला तो शौर्यात किंवा देशभक्तीत कमी पडला म्हणून नव्हे ० तो हरला कारण आपल्यापेक्षा इंग्रजांची तलवार अधिक तिखट होती ० त्यांची शस्त्रे आपल्यापेक्षा धारदार आणि लांब पल्ल्याची होती ० इस्लामी आतन्कवादाचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी आणि जगात शांतता नांदावी ह्यासाठी वसुधैव कुटुंबकं मानणाऱ्या भारताच्या हातात सर्वांना भारी पडणारे शस्र नांदले पाहिजे हे ओळखणारा नरेंद्र मोदी हा पहिला पंतप्रधान ० परंतु उद्धव हे काहीवेळा अवलक्षणी असल्यासारखे वागतात ० त्यांनी त्याच दिवशी मोदींवर आणि भाजपवर तोफा डागण्याचा कार्यक्रम पार पाडला ०

मोदी आणि भाजप महाराष्ट्राचा अपमान करीत असल्याची किंकाळी त्यांनी फोडली ० उद्धव ठाकरे ह्यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री पोलीस आयुक्ताला शंभर कोटी रुपयांची खंडणी गोळा करायला वेठीस धरतो असा त्याच्यावर आरोप आहे आणि चौकशी चालू आहे ० ह्याने महाराष्ट्राला खाली मान घालावी लागत आहे ० उद्धवच्या राज्यात पालघरला दोन साधुंना दगडांनी ठेचून मारले गेले ० त्याने महाराष्ट्राची शान वाढली काय ? गांधी आणि सावरकरांचे नाव घेण्याचीही भाजपाची लायकी नाही असे उद्धव बरळले ० गांधी आणि सावरकरांचे नाव घ्यायला विशेष अक्कल लागत नाही ० तुमचे अंत:करण देशभक्तीने परिपूर्ण भरलेले असेल , तुम्ही अखंड भारतवादी असाल , प्रत्येक भारतीयाने आत्मनिर्भर झाले पाहिजे असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही गांधी आणि सावरकरांचे नाव घेऊन त्यांच्या नेतृत्वाचे साक्षेपी विश्लेषण करू शकता ० दिल्लीला हरहर महादेवचा दणका दाखवायला पाहिजे अशी चिथावणी उद्धवनी शिवसैनिकांना दिली आहे ० केंद्र सरकारविरुद्ध एकप्रकारचे युद्ध त्यांना पुकारायचे आहे ० उद्धव ह्यांचे जेव्हढे वय आहे तेव्हढी शिवाजी महाराजांच्या अद्वितीयत्वावरील बौद्धिके नरेंद्र मोदींनी घेतली आहेत आणि त्याहून अधिकवेळा अधिकारी व्यक्तींची शिवाजी महाराजांवरील भाषणे त्यांनी ऐकली आहेत ० तेव्हा भलतीच आव्हाने त्यांनी देऊ नयेत ० त्यांच्या आवाक्यातील कार्यक्रम मी त्यांना सुचवितो ० त्यांनी शिवाजी ,गांधी आणि सावरकर ह्या तिघांवर मिळून एक तास कोणत्याही दूरचित्रवाहिनीवरून सलगपणे बोलावे ० महाराजांचे कोणते गुण गांधींनी आणि सावरकरांनी घेतले आणि दोघांच्या जीवनात शिवाजी किती आहे हे सांगावे ० त्याहून महत्वाचा कार्यक्रम म्हणजे बाळासाहेबांबरोबर काम केलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्याला भेटायला का येत नाहीत ह्याचा त्यांनी शोध घ्यावा ० महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर यशवंतरावांनी नेहरूंची आणि आचार्य अत्र्यांनी कम्युनिस्टांची प्रतिष्ठापना महाराष्ट्रात करण्याचा उद्योग आरंभिला ० तेव्हा महाराष्ट्राला शिवाजीचा आदर्श पुरेसा आहे ह्याचे स्मरण बाळासाहेबांनी करून दिले ० आज शिवाजीची जागा शिवसेनेपुरती शरद पवारांनी घेतली आहे ० हे उद्धव ह्यांचे कर्तृत्व आहे ० तोंडाला येईल ते बरळावे इतकी रा स्व संघ ही संघटना स्वस्त नाही हे त्यांनी ओळखावे ० काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा पाकिस्तानच्या दिशेने सरकत असल्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा इस्लामी आतन्कवादापासून हिंदूंचे आणि भारताचे संरक्षण करण्यासाठी संघाचा जन्म झाला आहे ० हिंदूंच्या आणि भारताच्या इतिहासातील संघ ही अभूतपूर्व घटना आहे ० उन्हापावसाची चिंता न करता संघाची शाखा चालविणाऱ्या लाखो स्वयंसेवकांनी ह्या देशातील आशावाद जिवंत ठेवला आहे ० सैन्य आणि संघ ह्या दोन सकारात्मक संस्था आज देशातील विश्वासाचे प्रमुख केंद्र बनल्या आहेत ० त्यामागे तपश्चर्या आहे ० उद्धवना भाजप समजून घ्यायचा असेल तर आधी त्यांनी संघाचा अभ्यास करावा ० अधिक काय सांगावे ?

लेखक - ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande