अशोक लेलँडचा निव्वळ नफा तिस-या तिमाहीत ६२ पटींनी वाढून ३६१ कोटी रुपयांवर
चेन्नई, ३ फेब्रुवारी, (हिं.स) – अशोक लेलँड या हिंदुजा समूहाच्या प्रमुख भारतीय कंपनीने आर्थिक वर्ष २३
अशोक लेलँडचा निव्वळ नफा तिस-या तिमाहीत ६२ पटींनी वाढून ३६१ कोटी रुपयांवर


चेन्नई, ३ फेब्रुवारी, (हिं.स) – अशोक लेलँड या हिंदुजा समूहाच्या प्रमुख भारतीय कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत ३३ टक्के एमएचसीव्ही मार्केट शेअर साध्य केला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात २६.१ टक्क्याची वाढ झाली आहे. अशोक लेलँडची डोमेस्टिक एमएचसीव्ही नं २८२२१ असून गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ६९ टक्क्यांची वाढ (१६६६७ नं) झाली आहे. तिमाहीतील उत्पन्न आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ५५३५ कोटी रुपयांवरून यंदा ९०३० कोटी रुपयांवर गेले आहेत. तिमाहीतील करोत्तर नफा ३६१.३ कोटी रुपयांवर गेला असून तो गेल्या वर्षाच्या याच कालावधीत ५.८ कोटी रुपये होता.

अशोक लेलँडची देशांतर्गत आकडेवारी आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत १६४०५ नं. वर गेली असून ती आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत (१४२३३) १५ टक्क्यांनी वाढली आहे.

कंपनीचा ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील २२४ कोटी रुपयांवरून (४.० टक्के) आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत ७९७ कोटी रुपयांवर (८.८ टक्के) गेला आहे.

आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत डेट २०४३ कोटी रुपयांवर गेले. डेट इक्विटी आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील ०.४ पटींवरून आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत ०.३ वर गेली आहे.

एमडीव्ही, आयसीव्ही आणि एलसीव्ही अशा तिन्ही विभागांत कंपनीचा विकास झाला आहे. कंपनीने पार्टनर सुपर, बडा दोस्त I1 आणि I2 व्हेरियंट लाँच करत एमएचसीव्ही आणि एलसीव्ही अशा दोन्ही विभागांत आपल्या उत्पादनश्रेणीचा विस्तार केला. एव्हीटीआर श्रेणी या भारतातील पहिल्या मोड्युलर ट्रक प्लॅटफॉर्मवर कंपनीला चांगली मागणी मिळाली. आर्थिक उलाढालीत वाढ झाल्यामुळे ही मागणी आणखी वाढणार आहे. एलसीव्ही विभागात दोस्त आणि बडा दोस्त या दोन्हींची कामगिरी चांगली झाली. भविष्यात ई- कॉमर्समुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटीची मागणी वाढणार असून त्यामुळे एलसीव्ही ट्रकच्या संख्येलाही चालना मिळेल. कंपनीने देशभरात ५७ नवी आउटलेट्स सुरू करत आपले नेटवर्क विस्तारले आहे. आफ्टर- मार्केट आणि पॉव सोल्यूशन्स बिझनेससारखे इतर व्यवसायही कंपनीच्या नफ्यात चांगली भर घालत आहेत.

अशोक लेलँडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. धीरज हिंदुजा म्हणाले, ‘निव्वळ नफ्यात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे आम्हाला पॅन भारतातील बाजारपेठेतला कंपनीचा हिस्सा वाढवणे शक्य झाले. बाजारपेठेतील हिस्सा वाढवत असतानाच आमची टीम चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कार्यरत आहे. निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चाचा योग्य वापर करण्यावर सातत्याने भर दिल्यामुळे अधिक चांगली आर्थिक कामगिरी करण्यास मदत झाली. कमॉडिटीच्या किंमती कमी झाल्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. हे क्षेत्र सातत्याने विकसित होत असून गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत दमदार आकडेवारी पाहायला मिळाली. मॅक्रोइकॉनॉमिक घटक अनुकूल असल्यामुळे आम्ही भविष्याबाबत विश्वासपूर्ण आणि आशावादी आहोत. दमदार उत्पादन श्रेणीच्या मदतीने आम्ही जागतिक बाजारपेठेतील विस्तार धोरण आणखी मजबूत करत आहोत.’

अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अगरवाल म्हणाले, ‘चालू तिमाहीमध्ये कंपनीच्या आकडेवारीत होत असलेल्या वाढीचा चांगला परिणाम दिसून आला. निर्मितीचा कमी खर्च आणि जास्त चांगल्या उत्पन्नामुळे आम्हाला नफा तसेच बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यास मोठी मदत झाली.

अत्याधुनिक उत्पादने आणि गुणवत्तापूर्ण टीमच्या मदतीसह आम्ही इतरांपुढे राहाण्याचे व नफ्यासह विकास आणि शाश्वतता साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande