स्वराज ट्रॅक्टर्सतर्फे 'स्वराज टार्गेट' नवी श्रेणी लाँच
मुंबई, 2 जून (हिं.स.) स्वराज ट्रॅक्टर्स हा महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि भारतात वेगाने विकसित हो
स्वराज ट्रॅक्टर्सतर्फे ‘स्वराज टार्गेट’ नवी श्रेणी लाँच


मुंबई, 2 जून (हिं.स.) स्वराज ट्रॅक्टर्स हा महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ब्रँडने आज आटोपशीर, हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर्सची नवी श्रेणी लाँच केली. ‘स्वराज टार्गेट’ असे नाव असलेली ही श्रेणी दर्जेदार कामगिरी, सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वजनाच्या ट्रॅक्टर्सच्या क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करेल.

‘स्वराज टार्गेट’ नव्या ट्रॅक्टरच्या श्रेणीचे विचारपूर्वक डिझाइन दर्शवते. ही श्रेणी भारतीय शेतकऱ्यांच्या अनोख्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेती उत्पादन वाढवण्यात मदत करण्याच्या हेतूने बनवण्यात आली आहे. त्यासाठी या ट्रॅक्टर्समध्ये अनोखी यंत्रणा वापरण्यात आली आहे.

प्रगतीशील आणि महत्त्वाकांक्षी तसेच शेतीच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञान आपलेसे करण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही श्रेणी खास तयार करण्यात आली आहे. या नव्या श्रेणीत ताकद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यात आला आहे. त्यामुळे स्प्रेइंगसह इतर विविध कामांसाठी त्याचा प्रभावी वापर करता येतो.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेल्या या श्रेणीमध्ये सहजपणे गियर बदलण्यासाठी सिंक्रोमॅश गियर बॉक्स देण्यात आला असल्यामुळे कार चालवत असल्यासारखे वाटते. त्याशिवाय ऑपरेटरला यातील वेगवेगळ्या सुविधा फक्त एका क्लिकच्या मदतीने वापरता येतात. याचा अरूंद ट्रॅक आणि वळवण्यासाठी लागणारी कमी जागा यांमुळे शेतकऱ्यांना कमी जागेतही सहजपणे ट्रॅक्टर चालवता येतो. पर्यायाने उत्पादनक्षमता वाढते व पिकाचे कमी नुकसान होते.

सुरुवातीला स्वराज ट्रॅक्टरची दोन मॉडेल्स उपलब्ध केली जातील. त्यात २०-३० एचपी स्वराज टार्गेट श्रेणीअंतर्गत (14.91 – 22.37kW) विभागाचा समावेश आहे. स्वराज टार्गेट ६३० मॉडेल सुरुवातीला स्वराजच्या महाराष्ट्र व कर्नाटकमधील वितरकांच्या नेटवर्कद्वारे उपलब्ध केले जाईल. त्याची किंमत रू.५.३५ लाख (एक्स शोरूम) पासून सुरू होईल. स्वराज टार्गेट ६२५ लवकरच लाँच केला जाईल.

महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या शेती उपकरण क्षेत्राचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘स्वराज टार्गेटच्या माध्यमातून स्वराज टार्गेटच्या विकासासाठी नवा विभाग खुला झाला आहे. त्यामुळे सध्या भारतीय शेती क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या हॉर्टीकल्चर यंत्रणेला वाव मिळणार आहे. स्वराजच्या पोर्टफोलिओमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले हे उत्पादन शेतीमध्ये बदल घडवून सर्वांचे आयुष्य समृद्ध व भविष्यासाठी सज्ज करण्याच्या आमच्या शेती उपकरण विभागाच्या तत्वाशी सुसंगत आहे.’

एम अँड एमच्या स्वराज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश चव्हाण म्हणाले, ‘स्वराज टार्गेट शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्स पुरवण्याच्या आमच्या मोहिमेतला लक्षणीय टप्पा आहे. स्वराज ट्रॅक्टर्स ताकद आणि विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध आहेत. या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आम्हाला शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मदत करणारे आधुनिक तंत्रज्ञान पुरवणे, शेतीच्या आधुनिक पद्धतींचा वापर करणे आणि जास्त मूल्य देणारी पिके घेण्यास सहाय्य करणे शक्य होणार आहे.’

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande