सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व बजाज ऑटो लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार.
पुणे , 22 जुलै (हिं.स.) : सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत व
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व बजाज ऑटो लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार.


पुणे , 22 जुलै (हिं.स.) : सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) पुणे व बजाज ऑटो लिमिटेड, पुणे यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.

या सामंजस्य करारानुसार Bajaj Engineers Skill Training (BEST) कार्यक्रमांतर्गत शिक्षण आणि उद्योग या दोन क्षेत्रांमधील असलेले अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील व उत्तीर्ण पदवीधर आणि डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा आणि चार महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश हा विद्यर्थ्यांना उद्योगासाठी तयार करणे व रोजगारक्षम बनवणे हा आहे. या मध्ये मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, इंडस्ट्री ४.० स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इम्प्रूव्हमेंट सिस्टम्स, मोशन कंट्रोल आणि सेन्सर टेक्नॉलॉजी यावरील प्रशिक्षणावर भर दिला जाईल.

बजाज इंजिनियर्स स्किल ट्रेनिंग (BEST) तर्फे विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल बजाज विद्यार्थ्यांच्या फीचा ८०% हिस्सा उचलेल आणि उर्वरित २०% विद्यार्थी भरतील. गरजू विद्यार्थ्यांसाठी व्याजमुक्त बँक वित्त देखील उपलब्ध असेल आणि मुद्दल रक्कम ही नोकरीनंतर घेतली जाईल.

श्री.जे.आर. पठारे, प्रमुख, एचआर, सिंबायोसिस सोसायटी आणि श्री. चंद्र प्रकाश त्रिपाठी, अध्यक्ष, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था (JBGVS) यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस व प्र- कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ), डॉ. रजनी गुप्ते, कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ), डॉ. एम.एस. शेजूल, रजिस्ट्रार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) डॉ. केतन कोटेचा संचालक, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे, श्री. सुधाकर गुडीपती उपाध्यक्ष, बजाज ऑटो लिमिटेडचे सीएसआर, श्री. रमेश वेणुगोपालसामी, हेड स्किलिंग, सीएसआर, बजाज ऑटो लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. केतन कोटेचा, संचालक, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यावेळी बोलताना म्हणाले कि, देशभरातील पदवीधर आणि पदविका विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी बजाज ऑटोसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हे सहकार्य या विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये मिळविण्यात मदत करेल जे त्यांना रोजगारा सक्षम बनवेल”.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande