भाजपला 2029 मध्ये स्वबळावर सत्ता – अमित शहा
मुंबई दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांशी साधला संवाद मुंबई, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : यंदा राज्यात महायुतीचे सरकार येईल, पण 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे तेव्हा कामाला लागा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित
मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना अभिवादन करताना अमित शाह व इतर नेते


मुंबई दौऱ्यात भाजप

कार्यकर्त्यांशी साधला संवाद

मुंबई, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : यंदा राज्यात महायुतीचे सरकार येईल, पण 2029

साली एकट्या

भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे तेव्हा कामाला लागा असे आवाहन केंद्रीय

गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. अमित शाह आज, मंगळवारी आपल्या मुंबई दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना

बोलत होते.

याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, जे सरकार काम करत तेच निवडणुक जिंकतात, देशात आपण सलग तिसरे सरकार बनवले. आता आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. महाराष्ट्रात महायुतीचेच

सरकार येईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार

येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सत्ता

आल्यास समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात

पहिल्यांदाच सलग 3 वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

यांनी केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे आणि

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती जिंकणार. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी

वाढवा, विजय

महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार

येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नसल्याचे

शाह यांनी सांगितले.

भाजप राज्य करण्यासाठी नव्हे तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत असल्याचे

सांगत अमित शाह म्हणाले की, राम मंदिर,

370 हटवणे हे काम

करण्यासाठी भाजप सत्तेत आली. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा

लागू करणार. महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षात

दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. मोदींच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान

अभिमानाने उंचावल्याचे शाह

म्हणाले. यंदाच्या निवडणुकीत10 टक्के

मतदान वाढवा. सरकार आपले आहे त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक,

आमदार व खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा.

प्रत्येक बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजेत.

दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत

राहतील. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर

किमान 20 लोकांना भाजपचे सदस्य करा.

सदस्य करताना मते मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला

आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना अमित शाह

म्हणाले की, राज्यातील 6

लोकसभा अशा आहेत, जिथे 5

विधानसभांमध्ये

आपल्याला बहुमत होते पण एका ठिकाणी विरोधक बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ 6 विधानसभा आपण जिंकू तर ते एकच जिंकतील.

महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडल व वॉर्ड स्तरावर योजना

पोहोचवा. विजय आपलाच असेल असे शाह यांनी सांगितले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande