इंदुर पुणे महामार्गावर कंटेनरखाली सापडुन वृद्धाचा मृत्यु
मनमाड , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर सानप कॉम्प्लेक्स समोर मालेगाव कडुन येवला दिशेने जाणाऱ्या कंटेनर खाली अशोक शिंदे उर्फ मिस्तरी नावाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमा
इंदुर पुणे महामार्गावर कंटेनरखाली सापडुन वृद्धाचा मृत्यु


मनमाड , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर सानप कॉम्प्लेक्स समोर मालेगाव कडुन येवला दिशेने जाणाऱ्या कंटेनर खाली अशोक शिंदे उर्फ मिस्तरी नावाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर सानप कॉम्प्लेक्स समोर मालेगाव कडुन येवल्याच्या दिशेने लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनर क्रमांक जीजे 12 बीएक्स 1228 खाली सापडुन अशोक शिंदे राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक वय 66 यांचा अपघाती मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला पुढील तपास पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande