सोलापुरात काँग्रेस नेत्याचा भाऊ आणि पुतण्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांनी आपले मोठे बंधू महादेव चाकोते आणि पुतण्या जयशंकर चाकोते यांच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेतजमीन अधिकाऱ्यांशी संगणमत करून ब
सोलापुरात काँग्रेस नेत्याचा भाऊ आणि पुतण्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा


सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।

काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांनी आपले मोठे बंधू महादेव चाकोते आणि पुतण्या जयशंकर चाकोते यांच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शेतजमीन अधिकाऱ्यांशी संगणमत करून बनावट फेरफार तयार करून नावे केल्याप्रकरणी विश्वनाथ चाकोते यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 2007 चे प्रकरण आता 2024 मध्ये उघड झाले आहे.

चाकोते यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, तत्कालीन तहसीलदार उत्तर यांचे १७/०५/२००७ रोजीचे अभिलेख संबधीत अधिकारी तहसीलदार याच्या कडील २३/११/२०२१ रोजीचे अभिलेख संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी सगणमत करून फिर्यादीचे मालकीच्या मौजे कांरबा सोलापूर येथील शेतजमीन गट नं ११२/१ मिळकतीच्या संबधाने सन २००७ मध्ये बनावट फेरफार प्रकरण तयार करून ते कार्यालयात सादर करून त्याचे नावाची नोंदीचा फेरफार तयार केला व तो खरा आहे असे भासवून त्या आधारे आरोपी जयशंकर चाकोते यांचे नावाचा ७/१२ उतारा तयार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे या करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande