हिजबुल्लाहचा हल्ला: इस्रायली सुरक्षा प्रणालीची परीक्षा
जेरूसलेम, १५ सप्टेंबर (हिं.स.) : इस्रायलवर १३ ऑक्टोबर रोजी झालेला हिजबुल्लाहचा हल्ला अत्यंत योजनाबद्ध आणि विध्वंसक होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहने इस्रायलच्या अत्याधुनिक तीन-स्तरीय संरक्षण यंत्रणेची क्षमता भेदली. हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्
हिजबुलाह हल्ला


जेरूसलेम, १५ सप्टेंबर (हिं.स.) :

इस्रायलवर १३ ऑक्टोबर रोजी झालेला हिजबुल्लाहचा हल्ला अत्यंत योजनाबद्ध आणि विध्वंसक होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहने इस्रायलच्या अत्याधुनिक तीन-स्तरीय संरक्षण यंत्रणेची क्षमता भेदली. हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलचे गंभीर नुकसान झाले. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक इस्रायली सैनिक जखमी झाले आणि लष्करप्रमुख हरजी हलेवी यांचा जीवही धोक्यात आला होता.

हिजबुल्लाहने इराणच्या मिरसाद २ ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला. यामध्ये इराण आणि रशियाने पुरवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे ड्रोन कार्बन फायबरपासून बनवलेले असून, अत्याधुनिक नियंत्रण प्रणालीने सुसज्ज आहेत. हिजबुल्लाहने हुदहुद ड्रोनद्वारे इस्रायली तळांच्या स्थितीची पूर्वतपासणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी गोलानी ब्रिगेडच्या मुख्यालयावर नेमके लक्ष्य साधले. या हल्ल्यामुळे इस्रायली लष्कराचे मुख्यालय हादरले.

हल्ला इस्रायलच्या गोलानी ब्रिगेडच्या मुख्यालयावर झाला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. हिजबुल्लाहच्या मते, हल्ल्याच्या वेळी लष्करप्रमुख हलेवी मुख्यालयात सैनिकांसोबत होते. जरी ते जखमी झाले असले, तरी ते काही तासांनी घटनास्थळी पुन्हा पाहणी करताना दिसले. हिजबुल्लाहने या ऑपरेशनला 'खैबर' असे नाव दिले होते. त्याचा अर्थ किल्ला असा होतो. इस्रायलच्या लष्करावर जोरदार आघात करत हिजबुल्लाहने त्यांच्या अत्याधुनिक यंत्रणेला तडा दिला.

या हल्लामुळे केवळ इस्रायलच्या लष्करावरच नव्हे, तर त्यांच्या संरक्षण तंत्रज्ञानावरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिजबुल्लाहच्या योजनाबद्ध रणनीतीने आणि अत्याधुनिक ड्रोनच्या वापरामुळे, इस्रायलवरचा हा सर्वात विध्वंसक हल्ला ठरला आहे. हिजबुल्लाहला इराण-रशिया तंत्रज्ञान मिळाल्याचा संशय आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande