महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : महाराष्ट्राचे संघ जाहीर
नाशिक , 26 ऑक्टोबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्ष
महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : महाराष्ट्राचे संघ जाहीर


नाशिक , 26 ऑक्टोबर (हिं.स.)।

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्षे मुले आणि मुली या गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम, पंचवटी, नाशिक येथे आयोजित या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील १९२ खेळाडूचा सहभाग होता.

मुलांच्या गटात धाराशिव संघाने विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात पुणे संघाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करुन विजेतेपद संपादन केले. या १९२ खेळाडूची स्पर्धेतील कामगिरी आणि थेट निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या ८० खेळाडू यांची निवड चाचणी घेण्यात आली. काल दिवसभर सुरु असलेल्या निवड चाचणीनंतर महाराष्ट्राच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुलांमध्ये धाराशिवचे तीन खेळाडू, पुणेचे तीन खेळाडू, नागपूर, सांगली, रायगड, वर्धा हिंगोली, आणि नाशिक यांच्या प्रत्येकी याक खेळाडूंचा समावेश आहे. मुलींमध्ये सांगलीच्या तीन, पुणेच्या दोन, तर धाराशिवच्या दोन, चंद्रपूरच्या दोन तर बीड, वर्धा आणि नाशिक यांच्या प्रत्येकी एक खेळाडूंचा समावेश महाराष्ट्राच्या संघामध्ये करण्यात आला आहे.

हे निवड झालेले संघ वाराणशी, उत्तर प्रदेश येथे दिनांक १० ते १४ डिसेंबर, २०२४ दरम्यान आयोजित शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सानंदा पाटील आणि क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली. महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेले खेळाडू -मुले -१) श्रेयश m(धारशिव)२) यश लोही (नागपूर) ३) आयुष खंडके (धारशिव) ४) उत्कर्ष राय (रायगड) ५) संस्कारदीप गीते (धारशिव) ६)आदि गायडुले (वर्धा) ७) कृष्णा बुचाले (हिंगोली) ८) वेदान्त ममाणे (पुणे) ९) दुर्गेश चौधरी (नाशिक) १०) राजविर भोसले( पुणे) ११)अरूल हळीगंळी (पुणे) १२) सार्थक जांगिड (सांगली).मुली - १) सिद्धी गायकवाड (सांगली) २) गायत्री नांदे (धारशिव) ३) सिद्धी सणस (पुणे) ४) अनुष्का जाधव (सांगली), ५) श्रावणी ताजणे (चंद्रपूर) ६)मनवा टण्णू (पुणे) ७) स्नेहा जाधव (सांगली) ८) जिया तोंडसाम (चंद्रपूर) ९) अक्षरा पवार (बीड) १०) स्वरा गायकवाड ( नाशिक) ११)निधी चौपाटे (धारशिव) १२) माहेश्वरी भावरकर (वर्धा).

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande