अहमदनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.):- टर्फ टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट मध्ये एच.एस.के संघ पैलवान चषक चा मानकरी ठरला आहे.नगर शहरातील १८ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
नगर शहरातील कोठला येथील पार्किंग येथे तीन दिवसीय पैलवान चषक भव्य टर्फ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत शहरातील १६ संघांनी सहभाग नोंदविला होता.या टूर्नामेंटमध्ये अंतिम सामना एच.एस.के संघ व के.जी सरकार संघ यांच्यात रंगला.या सामन्यामध्ये पैलवान चषक २०२४ चा मानकरी एच.एस.के संघ ठरला.संघमालक हाजी शमस खान यांना प्रथम २१ हजार २१२ रुपये व सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देण्यात आले.द्वितीय के.जी सरकार संघाचे युसुप शेख ११ हजार १११ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.तृतीय हेड अँड टेल संघास ५ हजार ५५५ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.या पैलवान चषक भव्य टर्फ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच देवीश बडे तर मॅन ऑफ द सिरीज हमजा सय्यद यांना देण्यात आले.यावेळी उद्योजक अफजल शेख,असलम शेख,फरहान शेख,गुलाम शेख,अझर दादा, अयाज शेख,नितीन बुरला, फैयाज सय्यद,अब्दुल्ला खोकर,हर्षल कांबळे,सतीश सातपुते,मुस्ताक शेख,शाहरुख शेख,पुंडे साहेब,अकबरभाई मुंबईवाले,एहसान पार्टी,फैजल पैलवान,जोयब शेख,शशी भाई आदीसह अफजल भाई फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni