रत्नागिरी, 3 ऑक्टोबर, (हिं. स.) : डेरवण (ता. चिपळूण) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात टाइम ट्रायलमध्ये ईशान वझे (चिपळूण) प्रथम आला. रुद्र जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात टाइम ट्रायल प्रकारात सुमेध आंबेकर (चिपळूण), श्री खानविलकर (दापोली) आणि वरद कदम (दापोली) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
इतर निकाल असे – १७ वर्षे वयोगट मास स्टार्ट – राज आंबेकर (रत्नागिरी), पियूष पवार (दापोली), वेदांत ढोल्ये (रत्नागिरी).
१७ वर्षे वयोगट मुली – स्नेहा भाटकर (दापोली), आध्या कवितके (रत्नागिरी).
१९ वर्षे वयोगट – टाइम ट्रायल -पृथ्वी पाटील (चिपळूण), युवराज चव्हाण (चिपळूण).
स्पर्धेचे आयोजन गणेश जगताप, अक्षय मारकड (क्रीडाधिकारी, रत्नागिरी), श्री. पराडकर, अविनाश पवार, विनायक पवार यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर