दुबई, 30 जुलै (हिं.स.)
टीम
इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा टी-२० क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल
क्रमांकावर विराजमान झाला आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर अव्वल स्थान
पटकावणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला आयसीसी
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. इंग्लंडचा फलंदाज जो
रूटने या यादीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत कोणताही
बदल झालेला नाही.
अभिषेकने
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे. आपल्या टी-२०क्रिकेट
कारकीर्दीत अभिषेकला पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत क्रमांक एकचे स्थान पटकावण्यात यश
आलं आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान सूर्यकुमार यादकडून ट्रॅव्हिस हेडने
हिरावून घेतेले होते. हेड अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२०
मालिकेत खेळला नव्हता. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
आयसीसीने
जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अभिषेक शर्माने ८२९ गुणांसह टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या
क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी तो दुसऱ्या स्थानावर होता. आता ट्रॅव्हिस
हेडचे ८१४ गुण आहेत. अभिषेक व्यतिरिक्त अव्वल पाच फलंदाजांमध्ये आणखी एका भारतीय फलंदाजाचे
नाव आहे. तिलक वर्मा ८०४ गुणांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या
क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra