हरियाणा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या
चंदीगड, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा आज, गुरुवारी थंडावल्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 5ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे
election commission logo


चंदीगड, 03 ऑक्टोबर

(हिं.स.) : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीच्या

प्रचार तोफा आज, गुरुवारी थंडावल्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 5ऑक्टोबर

रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

हरियाणा विधानसभा

निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासह इतर

नेत्यांनी जोरदार प्रचार केला. तर काँग्रेसकडून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधी, प्रियंका गांधी, भूपेंदर हुड्डा, दिपेंदर हुड्डा, कुमारी शैलजा, रणदीप सूरजेवाला यांच्यासह इतर नेत्यांनी

सत्ता परिवर्तनाचे आवाहन केले. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपमधील माजी

खासदार अशोक तंवर यांनी राहुल

गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रवेशावरून काँग्रेसने

मतदानापूर्वीच भाजपला काटशह दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande