बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन
मुंबई, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार तथा माजी आमदार सिताराम दळवी यांचे आज, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अंधेरी विधानसभा मतद
सिताराम दळवी


मुंबई, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार तथा माजी आमदार सिताराम दळवी यांचे आज, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्‍या तिकिटावर ते विजयी झाले होते. त्‍यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून ही विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कामकेलेल्या निष्‍ठावान शिवसैनिका पैकी ते एक होते.

शिवेसेनेच्‍या उभारतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार, सुना नातवंडे असा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande