शाही दसरा महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न
कोल्हापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.) कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आ
चित्रकला स्पर्धा संपन्न


कोल्हापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.) कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या वेळेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी नवरात्रोस्तवाच्या अनुषंगाने विविध चित्र रंगवून सहभाग घेतला.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande