नगर - सकल माळी समाजाच्या वतीने आ.संग्राम जगताप यांचा सत्कार
अहमदनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.):- अहमदनगर शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळ्याच्या परवानगीपासून ते निविदा पर्यंतचे सर्व कामांसाठी पुढाकार घेऊन पुतळा उभारणीत महत्त्वाचे योगदान देत असल्याबद्दल
सकल माळी समाजाच्या वतीने आ.संग्राम जगताप यांचा केला सत्कार


अहमदनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.):- अहमदनगर शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळ्याच्या परवानगीपासून ते निविदा पर्यंतचे सर्व कामांसाठी पुढाकार घेऊन पुतळा उभारणीत महत्त्वाचे योगदान देत असल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले कृती समिती व सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.तर पुतळा उभारणीच्या कामाचे लवकरात लवकर भूमीपूजन करण्या ची मागणी करण्यात आली.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष प्रा.माणिक विधाते,सचिव अशोक कानडे,सकल माळी समाज ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर डागवाले,ज्ञानेश्‍वर रासकर,श्‍याम व्यवहारे,गजानन ससाणे,अनिल इवळे,मच्छिंद्र बनकर,कॅप्टन सुधीर पुंड,संजय कानडे,अशोक आगरकर,अमित खामकर,दिपक खेडकर,भरत गारुडकर,अभिषेक चिपाडे,संतोष हजारे,आनंद पुंड,मनिष फुलडहाळे,प्रकाश इवळे,नारायण इवळे,गणेश पांढरे,किरण जावळे,संकेत लोंढे ,मळू गाडळकर,ऋषी ताठे,अतुल कावळे,रोहित पडोळे आदी उपस्थित होते.

प्रा.माणिक विधाते म्हणाले की,महापालिकेच्या माध्यमातून शहरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा उभारणीसाठी आमदार जगताप यांचा पुढाकार राहिला आहे.यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य मिळाले. पुतळे उभारण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळत नाही.मात्र आमदार जगताप यांनी पाठपुरावा करुन परवानगी मिळवून दिली.या पुतळ्याचे काम सुरू करण्याची ऑर्डर निघाली असून,लवकरात लवकर आचारसंहितापूर्वी याचे भूमिपूजन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की,सर्व समाजाला शिक्षणाची प्रकाशवाट दाखविणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा सर्व नागरिकांना प्रेरणा व स्फुर्ती देणारा ठरणार आहे.शहरात नव्याने उभे राहत असलेले महा पुरुषांचे पुतळे स्फुर्ती देणारे ऊर्जेचे केंद्र ठरणार असून,त्यांचे विचार व कार्य नव्या पिढी पर्यंत पोहच णार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.महात्मा फुले चौकात उभारण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले नगर कमानीचे काम प्रगतीपथावर असून त्याचे देखील उद्घाटन लवकर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी सकल माळी सामाजाच्या वतीने आमदार जगताप यांचे आभार मानण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande