पुनावळे, ताथवडे, वाकडमधील रस्त्यांना मंजुरी
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आग्रही असणारे, जनतेसाठी प्रशासनाशी कायम झगडणारे शहरातील युवा नेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी सतत्याने केलेल्या पाठपुराव्याला आणि मेहनती
पुनावळे, ताथवडे, वाकडमधील रस्त्यांना मंजुरी


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील

नागरिकांना पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आग्रही असणारे, जनतेसाठी प्रशासनाशी कायम झगडणारे शहरातील युवा नेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी सतत्याने केलेल्या पाठपुराव्याला आणि मेहनतीला यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाकड, ताथवडे व पुनावळेतील महत्वाच्या अनेक डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

विकास आराखड्यातील रस्त्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळेतील महत्वपुर्ण डीपी रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. या भागातील वाहतूक कोंडीचे विघ्न आता टळणार असून पीएमआरडी हद्दीतील मावळ, मुळशीचा भाग, आयटी नगरी हिंजवडसह पिंपरी-चिंचवड शहराशी व शहारातील विविध महत्वपुर्ण भागांशी कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार अससल्याने या भागातील स्थानिक रहिवासी व आयटीयन्सनी समाधान व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande