रांची,
20 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभेच्या 38 जागांवर आज, बुधवारी
दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.59 टक्के
मतदानाची नोंद करण्यात आली. राज्यात यापूर्वी 13 नोव्हेंबर रोजी
पहिल्या टप्प्यात राज्यातील विधानसभेच्या 43 जागांसाठी मतदान झाले होते.
झारखंडमधील विधानसभेच्या 81
पैकी 38 जागांसाठी एकूण 528 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये 472 पुरुष
आणि 55 महिलांव्यतिरिक्त एक तृतीय लिंग देखील रिंगणात आहे. दुसऱ्या टप्प्यात 27
सर्वसाधारण जागा, अनुसूचित जातीसाठी (एससी) 3
जागा आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 8 जागा राखीव आहेत. राज्यात बुधवारी झालेल्या शेवटच्या
टप्प्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कल्पना
सोरेन, बाबूलाल मरांडी आणि जयराम महतो
यांच्यासह 528 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. झारखंडमध्ये 38
जागांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.59 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात जामताडा
येथे सर्वाधिक 76.16 टक्के आणि सर्वात कमी बोकारो येथे 60.97 टक्के मतदान झाले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी