जम्मू-काश्मिरात एनआयएचीछापेमारी
जम्मू, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, गुरुवारी दहशतवादी घुसखोरी प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये धाडी टाकल्यात. यावेळी एनआयएने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या मदतीने राज्यात एकाच वेळी 8 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये रियासी, उधमपूर,
एनआयए लोगो


जम्मू, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, गुरुवारी दहशतवादी घुसखोरी प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये धाडी टाकल्यात. यावेळी एनआयएने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या मदतीने राज्यात एकाच वेळी 8 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये रियासी, उधमपूर, रामबन, किश्तवाड आणि डोडाचा समावेश आहे.

मागील काही दिवसांमध्‍ये राज्‍यात घुसखोरीच्‍या प्रकारात वाढ झाली आहे. त्‍याची गंभीर दखल घेत राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ही कारवाई केली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी 'एनआयए'ने दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरवल्‍याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद याच्‍या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्‍या खात्यात 15 लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे आढळले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान नावाच्या फरारी गुन्हेगाराने 15 लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले होते. साहिल अहमद याचा काका गुलजार अहमद मलिक 1992 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले होते.. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानातील सियालकोट येथे राहत होता. एनआयआयएच्या टीमने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांचीही चौकशी केली होती.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande