महाराष्ट्रात7 पैकी 5 एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत
केवळ 2 एक्झिट पोलमध्ये मविआला बहुमताची शक्यता मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यातील विधानसभा मतदान संपन्न झाल्यानंतर आता सत्ता सिंहासनावर कोण बसणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यानुषंगाने विविध एक्झिंट पोल्स पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत
संग्रहित लोगो


केवळ 2 एक्झिट पोलमध्ये मविआला बहुमताची शक्यता

मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यातील विधानसभा मतदान संपन्न झाल्यानंतर आता सत्ता सिंहासनावर कोण बसणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यानुषंगाने विविध एक्झिंट पोल्स पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत 7 एक्झिट पोल पुढे आले असून यापैकी 5 मध्ये महायुतीला सत्ता मिळताना दिसते आहे. तर 2 एक्झिट पोलसमध्ये मविआला बहुमत मिळत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

एसएएसच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 127-135 जागा, मविआ 147-155 जागा आणि इतरांना 10-13 जागा मिळताना दिसत आहेत. तर टाइम्स नाऊ जेव्हीसीच्या एक्झिट पोलने महायुतीला 150-167 जागा, मविआला 107-125 जागा मिळतील आणि इतरांना 13-14 जागा मिळतील असे म्हंटले आहे. इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 150 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 118 तर इतरांना 20 जागा मिळतील असे म्हंटले आहे. लोकशाही मराठी रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 128 ते 142 जागा, मविआला 125 ते 140 जागा आणि इतरांना 18 ते 23 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 122 ते 186 जागा, महायुतीला 69 ते 112 जागा आणि इतरांना 07 ते 12 जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 77 ते 108 जागा, शिवसेनेला 27 ते 50 आणि राष्ट्रवादीला 18-28 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला 28-47 जागा , शिवसेनेला(उबाठा) 16-35 जागा राष्ट्रवादी (तुतारी गट) 25-39 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 175 ते 195 जागा, एमव्हीएला 85 ते 112 जागा आणि इतरांना 07 ते 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये महायुतीला 152 ते 160 तर मविआला 130 ते 138 जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना 6 ते 8 जागा मिळत आहेत. एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150-170 जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये भाजपला 89 ते 101, शिवसेनेला 37 ते 45 आणि राष्ट्रवादीला 17-26 जागा मिळताना दिसत आहेत. तर मविआला 110 ते 130 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये काँग्रेसला 39-47, शिवसेनेला 21-29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 35-43 जागा मिळत आहेत. यासोबतच पी-मार्क्यूने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 137-157 जागा, काँग्रेसला 126-146 आणि इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रीसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 110 किंवा 130 जागा मिळू शकतात असे म्हंटले आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande