धुळ्यात राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धांचे आयोजन 
धुळे, 27 नोव्हेंबर (हिं.स.)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे मार्फत राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 चे आयोजन 28 ते 30 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत धुळ्यात होत आहे. अशी माहिती जिल्ह
धुळ्यात राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धांचे आयोजन 


धुळे, 27 नोव्हेंबर (हिं.स.)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे मार्फत राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 चे आयोजन 28 ते 30 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत धुळ्यात होत आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

यावर्षी 14, 17 व 19 वर्षांच्या वयोगटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 आयोजनाचा मान धुळे जिल्ह्यास मिळालेला असून यास्पर्धेचे आयोजन 28 ते 30 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी आठ विभागातुन 69 खेळाडू व 6 व्यवस्थापक असे एकुण 75 खेळाडु व्यवस्थापकासह याप्रमाणे एकूण 568 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातुन सहभागी होतील.

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल येथील वसतिगृह धुळे, शिवसागर मंगल कार्यालय, गरुड मैदान साक्री रोड, धुळे येथे करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे उद्धाटन 28 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथील इनडोअर हॉल मधील बॅडमिटन हॉल येथे होणार आहे. या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेस धुळे जिल्ह्यातील व शहरातील खेळांडूनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळे यांनी केले आहे.

या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी अहिराव, अध्यक्ष, धुळे जिल्हा कराटे संघटना, अॅड.दुष्यंतराज देशमुख, अध्यक्ष, धुळे कराटे ऑर्गनायझेशन, अमोर अहिरे, प्रशिक्षक, संदिप बाविस्कर, प्रशिक्षक व इतर सर्व कराटे असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, श्रीमती रेखा पाटील, स्वप्नील बोडे, श्वेता गवळी, योगेश्वरी मिस्तरी, मुद्रा अग्रवाल, मयुरी पवार, गौरव परदेशी, योगेश देवरे, मदन गावीत, ज्ञानेश्वर जाधव, राहुल देवरे, योगेश पाटील, दिनेश शिरसाठ हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असल्याची माहितीही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande