डेझर्ट वायपर्स आयएल T20 चॅम्पियन, अंतिम सामन्यात एमआय एमिरेट्सवर 46 धावांनी मात
दुबई, 05 जानेवारी (हिं.स.)दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात डेझर्ट वायपर्सने एमआय एमिरेट्सचा ४६ धावांनी पराभव करून आंतरराष्ट्रीय लीग टी२० (आयएलटी२०) विजेतेपद पटकावले आहे. कर्णधार सॅम करनने ७४ धावांची शानदार नाबाद खेळी करत वायपर्सना १८२ धा
डेझर्ट वायपर्स आयएल T20 चॅम्पियन


दुबई, 05 जानेवारी (हिं.स.)दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात डेझर्ट वायपर्सने एमआय एमिरेट्सचा ४६ धावांनी पराभव करून आंतरराष्ट्रीय लीग टी२० (आयएलटी२०) विजेतेपद पटकावले आहे. कर्णधार सॅम करनने ७४ धावांची शानदार नाबाद खेळी करत वायपर्सना १८२ धावा करण्यास मदत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना एमआय एमिरेट्स १३६ धावांवर सर्वबाद झाली. डेझर्ट वायपर्सचे हे पहिले आयएलटी२० विजेतेपद आहे. तर एमआय एमिरेट्सला १६ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागला आहे. गेल्या दोन हंगामात अंतिम सामना गमावणाऱ्या डेझर्ट वायपर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद जिंकले. मुंबई संघाने १६ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम सामना गमावला आहे.

एमआयच्या संघाने आंद्रे फ्लेचरला फक्त 26 धावांवर गमावले होते. या विकेटनंतर एमआयचे फलंदाज सातत्याने बाद झाले. शकिब अल हसनने संघाकडून सर्वाधिक 36 धावा केल्या. पोलार्डनेही संथ खेळी केली, त्याने 28 चेंडूत 28 धावा केल्या. डावाची सुरुवात करताना मोहम्मद वसीमने १० चेंडूत २६ धावा केल्या. इतर कोणताही क्रिकेटपची संघासाठी प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि एमआय एमिरेट्स संघाचा पराभव झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande