नाशिक, 9 नोव्हेंबर (हिं.स.)
हॉटेल ताजमध्ये स्पा सेंटरमधून मुंबईच्या व्यावसायिक महिलेचे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट कोणी तरी चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रचना ऋषभ चावला (वय ३६, रा. दादर पश्चिम, मुंबई) या व्यावसायिक असून, त्या दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वादहा ते बारा वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील गेटवे ताज हॉटेल येथे आल्या होत्या. त्या हॉटेल ताजमधील स्पा सेंटरमध्ये असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या मालकीचे अडीच लाख रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे डायमंडचे व सोन्याचे हातातील ब्रेसलेट कोणी तरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI