जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार
जळगाव, 9 नोव्हेंबर (हिं.स.)जळगाव शहरात अवैधपणे सिलींडरचा वापर सुरु असून अनेक दुर्घटना होताना दिसत आहेत. त्यातच पिंप्राळा भागात पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना घरगुती सिलिंडरचा साठा करून ठेवण्यासह गॅस भरणाऱ्या आसिफ अली उस्मान अली (२९, रा. पिंप्राळा हु
जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार


जळगाव, 9 नोव्हेंबर (हिं.स.)जळगाव शहरात अवैधपणे सिलींडरचा वापर सुरु असून अनेक दुर्घटना होताना दिसत आहेत. त्यातच पिंप्राळा भागात पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना घरगुती सिलिंडरचा साठा करून ठेवण्यासह गॅस भरणाऱ्या आसिफ अली उस्मान अली (२९, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच सिलिंडर व साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तीन दिवसांपूर्वीच जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात वाहनामध्ये गॅस भरताना स्फोट होऊन १० जण भाजले गेले होते. यानंतर अशा अवैध गॅस भरणा केंद्रांवर कारवाईचे निर्देश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले. त्यात पिंप्राळा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा विनापरवाना साठा करण्यासह गॅस भरला जात असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली.

पथकाने पिंप्राळा परिसरातील लाकडी वखारी समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये आसिफ अली हा एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून भरलेले दोन सिलिंडर, रिकामे तीन सिलिंडर, रेग्युलेटर, इलेक्ट्रीक मोटार असे एकूण आठ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.याप्रकरणी पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आसिफअली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande