नगरच्या नयना खेडकरला चीनमध्ये कुंगफू मध्ये सुवर्णपदक
अहिल्यानगर, 13 डिसेंबर (हिं.स.)।चीनमध्ये डुंगफुंग शहरात झालेल्या माउंट सोंगशान वुशू स्पर्धेत नगरची खेळाडू नयना खेडकर हिने कुंगफू मध्ये सुवर्ण पदक पटकाविले. या आंतरशालेय स्पर्धेत खेडकर हिने युनताई माउंटन इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करुन उत्कृष्ट खे
नगरच्या नयना खेडकर ला चीनमध्ये कुंग फू मध्ये सुवर्णपदक


अहिल्यानगर, 13 डिसेंबर (हिं.स.)।चीनमध्ये डुंगफुंग शहरात झालेल्या माउंट सोंगशान वुशू स्पर्धेत नगरची खेळाडू नयना खेडकर हिने कुंगफू मध्ये सुवर्ण पदक पटकाविले. या आंतरशालेय स्पर्धेत खेडकर हिने युनताई माउंटन इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

पाच दिवसीय या स्पर्धेत थाई आणि कुंगफूची स्पर्धा रंगली होती.या स्पर्धेत विविध देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.नयना खेडकर या मुळच्या नगर शहरातील असून त्या सध्या चीनमध्ये युनताई माउंटन इंटरनॅ शनल कल्चर आणि मार्शल आर्ट्स स्कूलमध्ये थाई व कुंगफू या सँडाचा सराव करत आहे.त्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजेतेपद पटकाविले.खेडकर या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून यशस्वी वाटचाल करत आहेत.सध्या गृहिणी असलेल्या लता खेडकर आणि निवृत्त पोलिस अधिकारी कै.निवृत्ती (एन.डी.) खेडकर यांच्या कन्या आहेत.यापूर्वी देखील मध्य चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ या शहरामध्ये झाले ल्या तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात खेडकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करत कुंगफू मध्ये रौप्य पदक पटकाविले होते.या यशाबद्दल नयना खेडकर हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande