मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, सात्विक-चिराग आणि आयुषची विजयी सलामी
क्वालालंपूर, 07 जानेवारी (हिं.स.)प्रदीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन करताना पी.व्ही. सिंधूने चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या बलाढ्य पुरुष दुहेरी जोडीसह नव्या हंगामाची विजयी सुरुवात मलेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत केली आहे. तर भारताच
आयुष शेट्टी


पी व्ही सिंधू


सात्विक आणि चिराग


क्वालालंपूर, 07 जानेवारी (हिं.स.)प्रदीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन करताना पी.व्ही. सिंधूने चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या बलाढ्य पुरुष दुहेरी जोडीसह नव्या हंगामाची विजयी सुरुवात मलेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत केली आहे. तर भारताच्या आयुष शेट्टीने धक्कादायक निकालाची नोंद केली. आयुषने २०२४ पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या मलेशियाच्या ली झी जियाचा सरळ गेममध्ये पराभव करण्याची किमया साधली आहे.

यूएस ओपन सुपर ३०० जिंकल्यानंतर प्रसिद्धी मिळवणाऱ्या शेट्टीने शेवटच्या ३२ सामन्यात २१-१२, २१-१७ असा शानदार विजय मिळवला. हा सामना फक्त ३९ मिनिटे चालला. शेट्टीचा सामना शेवटच्या १६ मध्ये चीनच्या अव्वल मानांकित शी यू क्यूशी होईल. जिया हा माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन आहे आणि सध्या तो जगात १४४ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या चायना मास्टर्सनंतर तो त्याची पहिलीच स्पर्धा खेळत आहे, दुखापतीमुळे बराच काळ खेळू शकला नाही.दरम्यान, दुखापतींपासून बराच काळ दूर राहिल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या पीव्ही सिंधूने मलेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या सुंग शुओ युनचा पराभव करून प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. पायाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी सिंधूने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्व बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धांमधून माघार घेतली होती. तिने पुनरागमन करताना चांगला खेळ केला आणि ५१ मिनिटे चाललेल्या सामन्यात सुंगचा २१-१४, २२-२० असा पराभव केला.

माजी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सात्विक आणि चिराग या जोडीने ३५ मिनिटांत चायनीज तैपेईच्या यांग पो-ह्सुआन आणि ली झे-ह्यू यांचा २१-१३, २१-१५ असा पराभव करून प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.डिसेंबरमध्ये हंगामाच्या अखेरीस होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जोडीचा सामना मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप यांच्याशी होणार आहे.

---------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande