रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर एक्स्प्रेसच्या फेर्यांना ३ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ही विशेष गाडी चालवली जात आहे. या गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूर तसेच तामिळनाडू राज्यातील कोईमतूर अशा लांब पल्ल्यात धावणारी ही गाडी प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने या गाड्यांच्या फेर्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढवल्या होत्या. आता त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर