चंद्रपूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। विरुर वनपरिक्षेत्रात शेतात काम करीत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली.
विरुर वनपरिक्षेत्रातील कोष्ठाळा नियतक्षेत्रालगत आपल्या अतिक्रमित शेतात जंगू आत्राम (५०) हे काम करीत होते. त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. त्या परिसरात इतक्यात कोणी गेलेले नसल्याने व त्यांच्या हरवल्याची तक्रार पण आलेली नसल्याने सदर प्रकार आज उघडकीस गावकऱ्यांना समजताच वनविभागाला माहिती मिळाली. त्याचा मृतदेह अर्धा कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांना मुलगा असून त्याने देखील वडील घरी न परतल्याची तक्रार पोलिसात दिलेली नसल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. सोबतच्या पायांच्या ठस्यांवरून वाघाने हा हल्ला केल्याचे प्राथमिकरित्या दिसत आहे. दरम्यान परिसरात गस्त वाढविण्यात आलेली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव