धुळे जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने' यावर होणार चर्चा
धुळे, 21 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यात सुशासन सप्ताहानिमित्त 'प्रशासन गाव की ओर' या उपक्रमांतर्गत सोमवार, 23 डिसेंबर रोजी नवीन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वा. 'जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने' यावर चर्चासत्राचे व
धुळे जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने' यावर होणार चर्चा


धुळे, 21 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यात सुशासन सप्ताहानिमित्त 'प्रशासन गाव की ओर' या उपक्रमांतर्गत सोमवार, 23 डिसेंबर रोजी नवीन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वा. 'जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने' यावर चर्चासत्राचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिली आहेत.

सुशासन सप्ताहानिमित्त 'प्रशासन गाव की ओर' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी जिल्हा प्रशासनामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत.

या कार्यशाळेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवृत्त अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ हे मार्गदर्शन करणार असून जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर या जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने यावर चर्चा करणार आहेत.

तसेच या कार्यशाळेत सुशासन सप्ताहानिमित्त विविध विभागांनी नागरिकांना सेवा पुरविणेकामी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करणे, कार्यालयीन कर्मचारी यांना दुचाकी वापरतांना हेल्मेट सक्तीबाबत अभियानास सुरुवात करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande